आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Shilpa Shetty Is Upset Over Raj Kundra's Arrest, Didn't Attend The Shooting Of Reality Show 'Super Dancer 4'

शिल्पा शेट्टीच्या नव-याला अटक:राज कुंद्राच्या अटकेमुळे चिंतेत आहे शिल्पा शेट्टी,, ‘सुपर डान्सर 4’ या रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगला राहिली गैरहजर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी चिंतेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी उशीरा रात्री अटक केली आहे. राजच्या विरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज कुंद्राने पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमध्ये 8 ते 10 कोटींची गुंतवणूक केली असल्याचे समजते. कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आरोप असून याच प्रकरणी त्याला अटक झाली आहे. मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितल्यानुसार, राज कुंद्रा हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून त्याच्याविरूद्ध आमच्याकडे पुरावे आहेत. पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी चिंतेत आहे.

शिल्पाची रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगला गैरहजेरी
मीडिया रिपोर्टनुसार, शिल्पाने मंगळवारी सुपर डान्सर 4 या डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या शूटिंगला हजेरी लावली नाही. या शोमध्ये ती सेलिब्रिटी जजच्या भूमिकेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा मंगळवारी 'सुपर डान्सर 4' चे दोन भाग शूट करणार असे ठरले होते, पण सोमवारी रात्री पतीच्या अटकेनंतर शिल्पाने शूटिंगमध्ये सहभागी न घेण्याचा निर्णय घेतला.

शिल्पाच्या गैरहजेरीचा शोच्या शूटिंगवर परिणाम झाला नाही. शिल्पाच्या अनुपस्थितीत गीता कपूर आणि अनुराग बासू हे दोन परीक्षक शोचे चित्रीकरण पूर्ण करत आहेत. याआधीही शिल्पाच्या संपूर्ण कुटूंबाला कोरोनाची लागण झाली होती, तेव्हादेखील 'सुपर डान्सर 4' चे शूटिंग शिल्पाशिवाय पूर्ण झाले होते.

राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे शिल्पा

राजने दोनदा लग्न केले. त्याचे पहिले लग्न कविता कुंद्राशी झाले होते. काही वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर राजने 22 नोव्हेंबर 2009 रोजी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी लग्न केले. त्यांना मुलगा विवान आणि मुलगी समिशा अशी दोन मुले आहेत.

बातम्या आणखी आहेत...