आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पाचे पुनरागमन:पती राज कुंद्राच्या अटकेनंतर तीन आठवड्यांनी कामावर परतणार शिल्पा शेट्टी, 'सुपर डान्सर चॅप्टर 4'चे करणार शूटिंग

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाच्या अनुपस्थितीत हे सेलेब्स दिसले

पॉर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्राला अद्याप दिलासा मिळालेला नाही. 19 जुलैपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. जेव्हापासून राज या प्रकरणात अडकला तेव्हापासून शिल्पाने आपल्या कामापाूसन स्वतःला दूर केले होते. मागील तीन आठवड्यांपासून ती रिअ‍ॅलिटी टीव्ही शो 'सुपर डान्सर चॅप्टर 4' च्या शूटिंगमध्ये सहभागी झाली नाही. या शोमध्ये ती परीक्षकाची भूमिका साकारत होती. तिला शोमध्ये रिप्लेस करण्यात येणार असल्याच्या बातम्या देखील रंगू लागल्या होत्या. पण आता शिल्पाने कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे.

रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर 4 च्या मंचावर गीता कपूर, शिल्पा शेट्टी आणि अनुराग बासू
रिअ‍ॅलिटी शो सुपर डान्सर 4 च्या मंचावर गीता कपूर, शिल्पा शेट्टी आणि अनुराग बासू

शिल्पा 17 ऑगस्टपासून शूटिंगवर परतत आहे

शोच्या जवळच्या सूत्रानुसार, शिल्पाने हा शो सोडला नाहीये. राज कुंद्रा प्रकरणादरम्यान ती शूटिंगवर परतण्यासाठी सज्ज झाली आहे. निर्मात्यांनीही तिला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांना शिल्पाच्या जागी दुसरा कोणीही सेलिब्रिटी नकोय. शिल्पासाठी शूटिंगवर परतणे हा एक मोठा निर्णय आहे. त्यासाठी तिला हवा तेवढा वेळ निर्मात्यांकडून देण्यात आला. शिल्पा 17 ऑगस्टपासून शूटिंगला सुरुवात करतेय आणि शोच्या शेवटपर्यंत ती त्याचा एक भाग असेल.

शिल्पाच्या अनुपस्थितीत हे सेलेब्स दिसले

शिल्पा गेल्या तीन आठवड्यांपासून शोमध्ये दिसली नाही. तिच्या अनुपस्थितीत काही सेलिब्रिटी गेस्ट शोमध्ये सहभागी झाले होते. ज्यात करिश्मा कपूर, जिनिलिया आणि रितेश देशमुख यांची नावे आहेत. या शोमध्ये अनुराग बासू आणि गीता कपूरही परीक्षकांच्या भूमिकेत आहेत.

मुलगा वियान, मुलगी समीषा आणि पत्नी शिल्पा शेट्टीसोबत राज कुंद्रा.
मुलगा वियान, मुलगी समीषा आणि पत्नी शिल्पा शेट्टीसोबत राज कुंद्रा.

राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे शिल्पा
राजचे दोन विवाह झाले होते. त्याचे पहिले लग्न कविता कुंद्राशी झाले. काही वर्षांनी दोघेही वेगळे झाले. यानंतर राजने 22 नोव्हेंबर 2009 रोजी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी लग्न केले. त्यांना मुलगा वियान आणि मुलगी समीषा ही दोन मुले आहेत.

बातम्या आणखी आहेत...