आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात:शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणते - 'माझा नवरा राज सर्वगुणसंपन्न आहे, पण त्याला गाता येत नाही'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा वीकएंडला डान्स, संगीत, मस्ती आणि रंजक किस्से सेलिब्रिटी शेअर करणार आहेत.

सुपर डान्सर 4 या कार्यक्रमाच्या या आठवड्याच्या भागात गायक कुमार सानू सहभागी होणार आहेत. यावेळी स्पर्धत 90च्या दशकातील त्यांच्या गाजलेल्या गाण्यांवर डान्स सादर करतील. कुमार सानू देखील आपली काही लोकप्रिय गाणी गुणगुणताना दिसतील आणि सर्वांना आठवणीच्या काळात घेऊन जाईल. हा वीकएंडला डान्स, संगीत, मस्ती आणि रंजक किस्से सेलिब्रिटी शेअर करणार आहेत.

या भागात एक विश बाउलची गंमत असणार आहे, ज्यात शो मधील प्रत्येकाला आपल्या इच्छा पूर्ण झालेल्या दिसतील.या शोची परीक्षक श्वेता शेट्टी हिने कुमार सानूकडे एक खास मागणी केली. या गाण्याची विनंती करताना तिने आपला पती राज कुंद्रा याच्याबद्दल एक गंमतीशीर किस्सा सांगितला. तिने कुमार सानूला ‘कभी हाँ कभी ना’ चित्रपटातील ‘वो तो है अलबेला’ गाणे म्हणण्याची विनंती केली, जे राज कुंद्राचे एक अत्यंत आवडते गाणे आहे.

यावेळी शिल्पाने सांगितले, “राज अगदी सर्वगुणसंपन्न आहे, पण त्याला गाता येत नाही. माझ्या नवर्‍याने हे गाणे म्हणायला सुरुवात केली आणि मी हे पुरते ओळखले की, गाणे म्हणणे त्याचे काम नाही! त्यामुळे, मला आशा आहे की, हे गाणे खरे कसे म्हणायला हवे हे तो आज ऐकेल (हसते).”

कुमार सानू म्हणाले, “एका रिअॅलिटी शोमध्ये मी हे गाणी पहिल्यांदाच म्हणत आहे.” आपल्या जबरदस्त आवाजाने त्यांनी सगळ्यांना भारावून टाकले आणि शिल्पाची इच्छाही पूर्ण केली. हे गाणे गाऊन झाल्यानंतर कुमार सानू म्हणाले, “मी राज कुंद्राला कधीच भेटलेलो नाही. पण मी त्याला हेच सांगीन की, तो कितीही चांगला किंवा वाईट गायक असला तरी त्याला जेव्हा गरज असेल तेव्हा त्याला मदत करण्यास मी तत्पर आहे.”

बातम्या आणखी आहेत...