आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Shilpa Shinde Decides To Quit The Show Because Of Sunil Grover, Now Producer Preeti Simos Replied On The Allegation Of Having The Show Signed By Lying

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गँग्स ऑफ फिल्मिस्तान:शिल्पा शिंदेने सुनील ग्रोव्हरमुळे शो सोडण्याचा घेतला निर्णय, फसवून शो साइन केल्याच्या आरोपावर आता निर्माती प्रीती सिमोसने दिले उत्तर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिल्पाने या कार्यक्रमाला रामराम ठोकला आहे.

अभिनेत्री शिल्पा शिंदेने विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हरच्या 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' या शोमधून छोट्या पडद्यावर पुनरागमनाची तयारी केली होती. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, शिल्पाने या कार्यक्रमाला रामराम ठोकला आहे.

  • वाहिनीचे सूत्र काय म्हणाले?

वाहिनीशी संबंधित एका सूत्राने सांगितले, 'जेव्हापासून सुनील ग्रोव्हरला या शोच्या कॉमेडी अॅक्टमध्ये सहभागी करुन घेतले आहे, तेव्हापासून शिल्पा स्वतःला असुरक्षित समजतेय. जेव्हा शिल्पाने हा शो साइन केला होता, तेव्हा सुनील केवळ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असेल असे तिला सांगण्यात आले होते. मात्र शेवटच्या क्षणी शोचा फॉर्मेट बदलण्यात आला. नवीन फॉर्मेटनुसार, सुनील प्रत्येक अॅक्टमध्ये झळकणार आहे, त्यामुळे शिल्पा नाराज आहे.'

सूत्राने पुढे सांगितल्यानुसार, "आतापर्यंत शिल्पाने फक्त 4 दिवस शूट केले असून आता तिने शोच्या निर्मात्यांशी किंवा टीममधील कोणत्याही सदस्यांशी बोलण्यास नकार दिला आहे. तिने शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सुनीलची एंट्री झाल्याने आपला अभिनय लोकांपर्यंत पोहोचणार नाही आणि आपली लोकप्रियता कमी होईल असे शिल्पाला कुठेतरी वाटतंय."

  • शिल्पाने शो सोडण्याविषयी निर्मात्यांना माहिती दिली नाही

तर दुसरीकडे या शोची निर्माती प्रीती सिमोसच्या म्हणण्यानुसार तिला आतापर्यंत शिल्पाने शो सोडल्याची कल्पना नाही. दिव्य मराठीसोबत झालेल्या बातचीतमध्ये प्रीती म्हणाली, "शिल्पा हा कार्यक्रम सोडण्याचा विचार करीत असल्याचे मला तुमच्याकडून (दिव्य मराठी) कळले, मला किंवा माझ्या टीममधील कोणालाही याची माहिती नाही. आम्हाला काहीच कळवण्यात आलेले नाही. सुनील ग्रोव्हरमुळे शिल्पाच्या कामाकडे लोक दुर्लक्ष करतील, असे तिला का वाटतंय हे मला कळत नाहीये. हे खरे आहे की, आम्ही फॉर्मेट थोडा बदलला पण तो बदल आवश्यक होता. सुनील खूप चांगला कलाकार आहे आणि त्याचे टॅलेंट आम्हाला वाया घालवायचे नाही."

प्रीती म्हणाली, "आम्ही हा बदल शोच्या सर्व कलाकारांसमोर ठेवला आणि सर्वांनी संमती दिली, शिल्पाही त्यावेळी काहीच बोलली नाही. अचानक ती असे का वागते हे कोणालाच समजू शकत नाहीये."

  • शिल्पाचा आरोप काय आहे?

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने या शोच्या निर्मात्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. ती म्हणाली, ''निर्माते सातत्याने कलाकारांशी खोटे बोलत आहेत. सुरुवातीला आम्हाला फक्त आठवड्यातून दोन दिवस काम करावे लागेल असे सांगण्यात आले होते. पण आता आमच्याकडून बारा बारा तास काम करुन घेतले जात आहे. या शोचे केंद्रस्थान सुनील ग्रोव्हर आहे. आम्ही फक्त मागे उभे राहून टाळ्या वाजवण्याचे काम करत आहोत. इतक्या दिवसांत मला स्क्रिप्ट देखील मिळाली नाही. अशा शोमध्ये मी दिर्घ काळ काम करु शकत नाही. निर्मात्यांनी मला फसवले आहे. या शोमध्ये कलाकारांचे मानसिक शोषण केले जात आहे.''