आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिग बॉस 16 चे पर्व आता शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी बिग बॉसच्या या सीझनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. या पर्वात कोण बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यंदाच्या पर्वात सर्वाधिक भाव खाऊन गेलेला स्पर्धक शिव ठाकरे याचे नशीब फळफळले आहे. शोचा ग्रँड फिनाले रंगण्यापूर्वीच शिव ठाकरेला बॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळाल्याची चर्चा असून ही ऑफर त्याला भाईजान सलमान खानने दिल्याचे म्हटले जात आहे.
टेलिचक्करने याविषयी वृत्त दिले आहे. शिव सलमान खानच्या चित्रपटातून डेब्यू करेल, असे म्हटले जात आहे. सलमान खानचे दोन चित्रपट रांगेत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' या सलमानच्या चित्रपटांची प्रतीक्षा चाहत्यांना आहे. मीडिया रिपोर्टनुसार शिव या दोन चित्रपटापैकी एका चित्रपटात झळकेल, शिवाय त्याची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. नेमका कोणता चित्रपट शिवने त्याच्या नावे करून घेतला हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचा टिझर 'पठाण' चित्रपटाच्या रिलीजवेळी रिलीज करण्यात आला होता. या टिझरमध्ये चित्रपटातील कलाकारांची झलक पाहायला मिळाली. या चित्रपटातून बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाझ गिल बॉलिवूड डेब्यू करत आहे. आता शिवही या चित्रपटातून डेब्यू करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
मुळचा अमरावतीचा शिव ठाकरे हा रिअॅलिटी शोसाठी प्रसिद्ध आहे. 'रोडीज', 'बिग बॉस मराठी 2' आणि आता 'बिग बॉस 16' हे तिन्ही शो शिवने गाजवले. या कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवचा एक मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. बिग बॉस 16 हा शो शिवच जिंकेल असा विश्वास त्याचे चाहते व्यक्त करत आहे. दरम्यान सोशल मीडियावर 'विजयी भव शिव ठाकरे' असे ट्रेंडही होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.