आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Shivin Narang,gets Discharged From The Hospital After Surgery, Expressed His Gratitude To The Health Care Staff By Sharing The Post

फॅन्ससाठी आनंदाची बातमी:शिविन नारंगला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, शस्त्रक्रियेनंतर पोस्ट शेअर करून डॉक्टर आणि नर्सचे मानले आभार 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याने ही माहिती देताना रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचा-यांचे आभार मानले.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शिविन नारंगला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी घरातच काचेच्या टेबलवर पडल्यामुळे  शिविनच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  शिविन बुधवारी रुग्णालयातून घरी परतला. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याने ही माहिती देताना रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचा-यांचे आभार मानले.

'बेहद 2', 'खतरों के खिलाडी' या शोमध्ये झळकलेला शिविन घरीच काचेच्या टेबलवर पडला होता. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शिविनने इंस्टाग्रामवर रुग्णालयातील छायाचित्रे शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले,  ‘आता मी ठिक आहे. माझ्या कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांसाठी मी घरत परत येत आहे. मी लवकरात लवकर ठिक होण्यासाठी तुम्ही प्रार्थना केली त्यासाठी तुमचे आभार. दुर्दैवाने घरात माझ्यासोबत एक घटना घडली आणि मी जखमी झालो होतो. त्यानंतर माझ्या हाताची सर्जरी झाली.’ 

सोबत शिविनने त्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि नर्सचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले, "डॉक्टर्स आणि स्टाफला धन्यवाद. या कठीण काळात तुम्ही माझी काळजी घेतली. मला आठवतंय, हॉस्पिटलच्या एका स्टाफने मला म्हटले होते, सर आम्ही करणार नाही, तर मग कोण करणार. खरे हीरो.'  यापूर्वीही  बेहर 2 च्या एका सीनदरम्यानही त्याच्यासोबत  शिविनबरोबर मोठा अपघात टळला. 1 जानेवारी रोजीही शिविनला  हेअरलाइन फ्रॅक्चरमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

बातम्या आणखी आहेत...