आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्यासाठी कठीण काळ:टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोक, चाहत्यांना म्हणाला, 'त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून देवाकडे प्रार्थना करा'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शोएब इब्राहिमने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये वडिलांच्या तब्येतीचा उल्लेख केला आहे.

टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमच्या वडिलांना ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोशल मीडियावर ही माहिती देताना शोएबने चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. शोएबने लिहिले, 'तुमच्या प्रार्थनांची खूप गरज आहे. पप्पांना सकाळी ब्रेन स्ट्रोक आला आणि ते सध्या आयसीयूमध्ये आहेतय कृपया तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा की, अल्लाह त्यांना बरे करेल.' शोएबची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका कक्कर हिनेही ही पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

शोएब इब्राहिमने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये वडिलांच्या तब्येतीचा उल्लेख केला आहे.
शोएब इब्राहिमने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये वडिलांच्या तब्येतीचा उल्लेख केला आहे.

शोएबच्या वडिलांना यावर्षी फेब्रुवारीमध्येही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडिलांना बरे वाटल्यानंतर शोएबने प्रार्थनांसाठी चाहत्यांचे आभार व्यक्त केले होते.

वडिलांच्या इच्छेविरूद्ध निवडला होता अभिनयाचा मार्ग

काही दिवसांपूर्वी शोएब चाहत्यांसाठी यूट्यूबवर लाइव्ह आला होता, जिथे त्याने आपल्या संघर्षाबद्दल सांगितले होते. शोएबने सांगितल्यानुसार, त्याने मनोरंजन क्षेत्रात येऊ नये, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेविरूद्ध तो अभिनयाच्या जगात आला होता. पहिले शिक्षण पूर्ण करावे आणि त्यानंतर काय हवं ते करावे, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. शोएबने सांगितले होते, 'मी चित्रपटसृष्टीत कोणालाही ओळखत नव्हतो, मी भोपाळ येथून माझा प्रवास सुरु केला होता. मला जिथे जिथे ऑडिशन देण्याची संधी मिळायची तिथे मी जायचो. मला माहिती असायचे की, काही ऑडिशन बनावट आहेत आणि ते पैशांची मागणी करतील, परंतु तरीही मी तिथे जायचे जेणेकरुन मी माझ्या डायलॉग डिलिव्हरीची रिहर्सल करू शकेन.'

शोएब इब्राहिम दिपिका कक्कर सोबत.
शोएब इब्राहिम दिपिका कक्कर सोबत.

'ससुराल सिमर का' या मालिकेतून मिळाली लोकप्रियता
शोएबने 'रहना है तेरी पलकों की छाओं में' या मालिकेतून टीव्हीच्या जगात प्रवेश केला. यानंतर त्याला 'ससुराल सिमर का' या शोमध्ये काम मिळाले जो त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. या सीरियलच्या शुटिंगदरम्यान त्याची भेट दीपिका कक्करशी झाली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर 2018 मध्ये दोघांचे लग्न झाले.

बातम्या आणखी आहेत...