आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही अपडेट:मॉक शूटनंतर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात, लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार नवीन भाग

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॉक शूट म्हणजे सोशल डिस्टंन्सिंग राखून कसे शूटिंग करता येईल याची रंगीत तालीम असते. त्यानंतर प्रत्यक्षात शूटिंगला सुरुवात करण्यात येते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता यांच्या उल्टा चश्माचे चित्रीकरण 19 मार्चपासून थांबले होते.  या मालिकेतील कलाकार आणि क्रू मेंबर्सची संख्या जास्त असल्याने महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतरही चित्रीकरण सुरू झाले नव्हते. शुक्रवारी शोचे मुख्य दिग्दर्शक मालव राजदा यांनी सेलेब्सशिवाय मॉक टेस्ट केली, ज्यामध्ये अडचण न जाणवल्याने आता शोच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, या कार्यक्रमाचे निर्माते असित मोदी यांनी शूटिंग सुरू होण्यासंदर्भात दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, 'तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेच्या चित्रीकरणाला 10 जुलै पासून सुरुवात झाली आहे. लवकरच हा कार्यक्रम तुमच्या टीव्ही स्क्रीनवरही येणार आहे. कृपया आमच्या संपूर्ण टीमसाठी प्रार्थना करा. आम्ही धैर्याने सेटवर परतलो आहोत.  सोशल डिस्टन्सिंगचे पालण करणे, प्रोटेक्टिव गियर्स घालणे आणि सराकरेने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळणे या सर्व गोष्टींची आम्ही काळजी घेतोय, असे असित मोदी म्हणाले. 

सुमारे 115 दिवसांनंतर शूटिंग सुरु झाल्याने या शोचे मुख्य दिग्दर्शक मालव राजदा यांनीही आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मॉक टेस्ट आणि शूटिंगची झलक शेअर केली. सोबतच लिहिले, 'रोल, रोलिंग, अॅक्शन, अखेर115 दिवसांनंतर शूटिंग पुन्हा सुरु झाले. काम सुरू करून खूप छान वाटत आहे. मग हसण्यासाठी सज्ज व्हा', असे ते म्हणाले आहेत.

तसं पाहता 13 जुलैपासून छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांचे नवीन आणि फ्रेश एपिसोड्स प्रेक्षकांना बघता येणार आहेत, मात्र तारक मेहता का उल्टा चश्माचे नवीन एपिसोड्ससाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे. खरं तर या शोचे बँक एपिसोड्स पूर्वीपासूनच तयार आहेत. मात्र तेथून कहाणी पुढे नेल्यास निर्मात्यांना जास्त वेळ लागेल. त्यामुळे आता नवीन एपिसोड्चे चित्रीकरण करण्यात येणार आहे. 

 

  • शोमध्ये 'बावरी'ची भूमिका साकारणा-या मौनिका भदोरियाच्या भावाला कोरोनाची लागण 

या शोमध्ये बावरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मौनिका भदोरिया शूटिंग थांबल्याने सध्या भिंड येथे आपल्या गावी कुटूंबासमवेत वेळ घालवत आहे. दरम्यान, तिच्या भावाचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्याची बातमी समोर आली आहे. भावाला कोरोनाची लागण झाल्यानंतर शनिवारी मौनिका आणि तिच्या कुटुंबाचे नमुने घेतले जातील. असे सांगितले जाते की, तिचा भाऊ मुरैना येथे एका नातेवाईकाच्या कार्यक्रमासाठी गेला होता तेथे त्याला कोरोनाची लागण झाली. 

बातम्या आणखी आहेत...