आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन आयडल 12:शोवर टीका होत असल्याने आदित्य नारायणने व्यक्त केली खंत, म्हणाला  - IPL बंद झाल्याचा राग लोक शोवर काढत आहेत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदित्य म्हणाला - आयपीएल बंद झाल्याने आपली तरुण पिढी नाखूष आहे

'इंडियन आयडल 12' या सांगितिक रिअॅलिटी शोवर अलीकडेच टेलिकास्ट झालेल्या एका एपिसोडमुळे बरीच टीका झाली. या स्पेशल एपिसोडमध्ये दिवंगत ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती. किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी देखील शोला पसंत करत नसल्याचे सांगितले होते. नेटक-यांनीही शोमधील स्पर्धक, परीक्षकांवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता या शोच्या होस्ट आदित्य नारायणने शोवर टीका होत असल्याने खंत व्यक्त केली आहे. आयपीएल बंद झाल्याचा राग लोक यावर शोवर काढत आहेत, असे आदित्य म्हणाला आहे.

आयपीएल बंद झाल्याने आपली तरुण पिढी नाखूष आहे
एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आदित्य नारायण म्हणाला, "मला वाटतं की, आयपीएल बंद होऊन दोन ते तीन आठवडे झाले आहेत आणि आता लोक त्याचा सगळा राग आमच्या कार्यक्रमावर काढत आहेत. आयपीएल बंद झाल्यापासून तरुणांच्या पालकांच्या हाती टीव्ही रिमोट गेले आहे आणि आता पालक इंडियन आयडल बघतात. त्यामुळे आपली तरुण पिढी नाखूष आहे. आपला राग कोठे काढायचा हे त्यांना समजत नाही. यात मी सुद्धा येतो. कारण मीसुद्धा 7-7.30 ला टीव्हीसमोर मॅच बघायला बसायचो. मी तर माझ्या मोबाईल फोन अॅप्समध्ये क्रिकेटच्या टीम बनल्या होत्या. मी हे मागील वर्षी आणि यावर्षीही केले. आपण टीव्हीवर प्रसारित होणा-या सर्व गोष्टींचा थोडा आनंद घेत असतो. आता फक्त आपल्याकडे जास्त वेळ आहे, म्हणून असे होते," असे आदित्य म्हणाला.

मला माहित नाही की अचानक अमित कुमार यांना काय झाले
केवळ प्रेक्षकच नव्हे तर किशोर कुमार यांचा मुलगा आरजे अमित कुमार यांनीदेखील शोवर टीका करताना, मला हा एपिसोड अजिबात आवडला नाही असे म्हटले होते. ते किशोर कुमार स्पेशल एपिसोडचे खास पाहुणे होते. पण एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला होता की, शोच्या निर्मात्यांनी त्यांना सर्व स्पर्धकांचे कौतुक करण्यास सांगितले होते. याबद्दल बोलताना आदित्य म्हणाला, "अमित कुमार बर्‍याचदा या कार्यक्रमात पाहुणे म्हणून उपस्थित झाले आहेत. ते संगीत क्षेत्रातील एक सीनिअर मेंबर आहेत, आणि माझ्या वडिलांपेक्षाही थोडे मोठे आहेत. मला व्यक्तिशः अमित यांना काही म्हणायचे नाही. ते जेव्हाही या शोमध्ये आले तेव्हा त्यांनी आमच्यासोबत चांगला वेळ घालवला. मागील दोन पर्वात ते 2- 3 वेळा आले होते. त्यामुळे अचानक त्यांना काय झाले हे मला माहित नाही," असे आदित्य म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...