आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुंडली भाग्य:वजन कमी करण्यासाठी मालिकेच्या सेटवर लोकप्रिय गाण्यांवर नृत्य करतात श्रद्धा आणि अंजुम, याबद्दल श्रद्धा आर्य म्हणाली...

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पडद्यावरील या बहिणींनी सेटवर एक आगळ्या प्रकारचा व्यायाम केला.

लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’ पुन्हा सुरू झाल्यानंतर तिच्या कथानकाला नवी कलाटणी देण्यात आली. यात लाडक्या प्रीता आणि करण यांच्यातील काही रोमँटिक प्रसंगांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. काही दिवसांतील चित्रीकरणाचे प्रदीर्घ वेळापत्रक आणि त्यातील धावपळीमुळे श्रद्धा आणि अंजुम यांना खूप थकल्यासारखे झाले होते. शरीरावरील हा थकावटीचा ताण दूर करण्यासाठी व्यायामासारखा दुसरा चांगला उपाय कोणता असणार! किंबहुना पडद्यावरील या बहिणींनी सेटवर एक आगळ्या प्रकारचा व्यायाम केला आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल माध्यमांवर शेअर केला.

यासंदर्भात श्रद्धा आर्य म्हणाली, “अंजुम आणि मी या दोघी अगदी जीवलग मैत्रिणी असलो, तरी आम्हाला धमालमस्ती करायला फार आवडते. त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला की, आम्ही 90 च्या दशकातील लोकप्रिय गाणी लावतो आणि त्यावर नाच करतो. चित्रीकरणाच्या धावपळीच्या सत्रामुळे जिममध्ये जायला आम्हाला वेगळा वेळच मिळत नाही. तेव्हा कुंडली भाग्यच्या सेटवर अशा प्रकारे जुन्या लोकप्रिय गाण्यांवर नृत्य करून आम्ही आमच्या कॅलरी जाळतो. पण आता लवकरच आम्ही दोघी एका वेलनेस रिसॉर्टमध्ये जाणार असून तिथे आम्ही मनंशांत करणार आहोत. आम्हाला तिथे कधी एकदा जातो, असं झालंय.

बातम्या आणखी आहेत...