आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सोनी टीव्ही’चा जाहीर माफीनामा:श्रद्धा हत्याकांडावरील एपिसोड हटवला, आफताबला हिंदू तर श्रद्धाला ख्रिश्चन दाखवण्यात आले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोनी टेलिव्हिजनवर 27 डिसेंबर 2022 रोजी प्रसारित झालेल्या 'क्राइम पेट्रोल' या कार्यक्रमाच्या एका भागावरुन चांगलाच गदारोळ झाला. ‘क्राइम पेट्रोल 2.0’ या नव्या सीझनमध्ये श्रद्धा वालकर हत्याकांडावर बेतलेला एक एपिसोड दाखवण्यात आला होता. हा एपिसोड श्रद्धा वालकर प्रकरणावर आधारित असल्याचे म्हटले गेले नव्हते. पण, त्यातील संदर्भ या हत्याकांडाशी निगडीत होते. इतकेच नाही तर यातील मुख्य भूमिका साकारणाऱ्या लोकांचा धर्म बदलल्याने प्रेक्षक आणखीनच संतापले.

या एपिसोडमध्ये मुलीचे नाव एना फर्नांडिस होते आणि ती ख्रिश्चन असल्याचे दाखवले होते. तर, मुलाला हिंदू दाखवण्यात आले. मुलाचे नाव बदलून मिहिर ठेवण्यात आले होते. या भागातील दृश्ये आणि कथेतील साम्य लक्षात येताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावर विरोध दर्शवायला सुरुवात केली. लोकांनी सोशल मीडियावर बॉयकॉट सोनी टीव्ही हा ट्रेंड चालवला. वाहिनीने आरोपी आणि पीडितेचा धर्म बदलला आहे, यावरून त्यांची कलुषित मानसिकता दिसून येते, असे लोकांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणी सोनी टीव्हीने निवेदन देत जाहीर माफी मागितली आहे.

काय म्हणाली वाहिनी?
सोनी चॅनलने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले, ‘काही दर्शकांनी ‘क्राइम पेट्रोल’च्या अलीकडील एका भागावर कमेंट करत ती काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेसारखी वाटते. पण तसं नसून ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि ती 2011 मध्ये घडलेल्या एका खून प्रकरणावरून प्रेरित आहे. या कथेचा किंवा प्रसंगाचा कोणत्याही अलीकडील घटनेशी कोणताही संबंध नाही. आमच्या चॅनलवर प्रसारित होणारा कंटेंट प्रसारणाच्या मानक आणि नियमांनुसार आहे, याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. पण या प्रकरणात, आम्ही प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन एपिसोड हटवला आहे. या एपिसोडच्या प्रसारणामुळे आमच्या प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागत आहोत,” असे त्या पत्रात म्हटले आहे.

हटवण्यात आला एपिसोड
दरम्यान, प्रेक्षकांचे आक्षेप व विरोधानंतर सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तो एपिसोड हटवण्यात आला आहे, अशी माहिती चॅनलने दिली आहे.

नाव आणि धर्म बदलून श्रद्धा-आफताबची कहाणी दाखवली
2022 मध्ये घडलेल्या श्रद्धा वालकर मृत्यू प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. वसईतील श्रद्धाची तिचा प्रियकर आफताब पूनावाला याने हत्या केली होती. त्याने श्रद्धाचा निर्घृण खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीतील जंगलात फेकले होते. सोनी टेलिव्हिजनने ‘क्राइम पेट्रोल’च्या एका भागात श्रद्धा प्रकरणावर आधारित एक एपिसोड प्रसारित केला होता. यात मिहिर आणि एना दोघेही एका मंदिरात लग्न करताना दिसतात. या एपिसोडमध्ये नाव, धर्म आणि स्थळ वगळता आफताबने श्रद्धासोबत नेमके काय केले याचे चित्रण केले गेले. एपिसोडमध्ये मिहिर एनाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे तुकडे करतो आणि शहराच्या विविध भागात ते फेकतो. यावरून मोठा वाद निर्माण झाला. वाहिनीने तथ्य आणि पात्रांशी छेडछाड केली आहे जी अजिबात स्वीकारली जाणार नाही, असा पवित्रा लोकांनी घेतला होता.

सोशल मीडियावर लोकांनी व्यक्त केला संताप
खर्‍या गुन्हेगाराचे नाव सांगण्याची हिंमत चॅनलमध्ये नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

का केली होती आफताबने श्रद्धाची हत्या?

श्रद्धाचे वसईतच राहणाऱ्या आफताब पुनावालाशी 2019 पासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडीलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. गेल्यावर्षी मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. या दोघांची भेट एका डेटिंग अॅपवर मुंबईत असताना झाली. दोघे मागील तीन वर्षांपासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. नोकरीनिमित्त ते दिल्लीत स्थायिक झाले होते. दिल्लीत स्थायिक झाल्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने याच संतापातून तिची हत्या केली.

बातम्या आणखी आहेत...