आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी एक धक्का:'श्रीगणेश' फेम अभिनेते जगेश मुकाटी यांचे निधन, श्वास घ्यायला त्रास होत असल्याने चार दिवसांपासून होते रुग्णालयात दाखल 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगेश मुकाटी यांनी 'हंसी तो फंसी' (2014) आणि 'मन' (1999) या चित्रपटांमध्ये झळकले होते. याशिवाय त्यांनी हिंदी मालिका आणि गुजराती नाटकांमध्येही काम केले होते.

‘अमिता का अमित’, ‘श्रीगणेश’ यांसारख्या मालिका व ‘हंसी तो फसी’, ‘मन’ या चित्रपटांत भूमिका साकारणारे अभिनेते जगेश मुकाटी यांचे  निधन झाले. 10 जून रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 47 वर्षांचे होते. त्यांना दीर्घ काळापासून अस्थमाचा आजारा होता. ते गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. बुधवारी त्यांना श्वास घेताना खूप त्रास जाणवला. अखेर दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

गुजराती रंगभूमीवर त्यांनी स्वतःची वेगळी ओखळ निर्माण केली होती आणि अनेक टीव्ही मालिका आणि हिंदी-गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांनी 'अमिता का अमित', 'कसम से' या मालिकांमध्ये काम केले होते. मात्र त्यांना धीरज कुमार यांची निर्मिती असलेल्या 'श्रीगणेश' या मालिकेतील गणेशाच्या मुख्य भूमिकेतून लोकप्रियता मिळाली होती. अनेक जाहिरातींमध्येही ते दिसले. अलीकडेच ते 'चाल जीवी लईए' या गुजराती चित्रपटात झळकले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.   

जगेश यांचे बालपणीचे मित्र आणि अनेक गुजराती नाटकांमध्ये काम करणारे संजय गोराडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगेश यांना चार दिवसांपूर्वी श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारदरम्यान त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अचानक आलेल्या अस्थमाच्या अटॅकमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. 

संजय गोराडिया यांनी सांगितल्यानुसार, गेल्या काही वर्षांत जगेश यांचे वजन सातत्याने वाढत होते. त्यांचे वजन 150 किलो झाले होते. अनेक मित्रांनी त्यांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्जरी करण्याचाही सल्ला दिला होता, पण त्यांनी तो ऐकला नव्हता. 

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अभिनेत्री अंबिका रांजणकर यांनी जगेश यांच्यासोबत कसम से या मालिकेत आणि दोन गुजराती नाटकांत काम केले होते. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट लिहित जगेश यांना श्रद्धांजली वाहिली. ‘खूपच दयाळू, साथ देणारे आणि कमालीची विनोदबुद्धी असणारे व्यक्तीमत्त्व.. खूप लवकर आम्हाला सोडून गेले.. तुमची खूप आठवण येईल’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबत जगेश यांच्यासोबतचा एक फोटोसुद्धा अंबिका यांनी पोस्ट केला आहे.

गेल्या काही महिन्यांत चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार हे जग सोडून गेले आहेत. कोरोनाच्या काळात आतापर्यंत इरफान खान, ऋषी कपूर, चिरंजीवी सरजा, दिशा सालियन, संगीतकार वाजिद खान, प्रेक्षा मेहता, मनमीत ग्रेवाल यांनी या जगाचा निरोप घेतला. 

बातम्या आणखी आहेत...