आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेताच्या अडचणीत वाढ:मुलाच्या व्हिसावर बनावट स्वाक्षरी केल्याप्रकरणी श्वेता तिवारीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल, 14 वर्षांची होऊ शकते शिक्षा

किरण जैनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीये. साधारण तीन महिन्यांपूर्वी श्वेताचा नवरा आणि अभिनेता अभिनव कोहलीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. श्वेता आपल्या 4 वर्षांचा मुलगा रेयांशला भेटू देत नसल्याचा आरोप अभिनवने तिच्यावर केला होता. दरम्यान, श्वेताविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वेताने बनावट स्वाक्षरी करुन मुलगा रेयांशसाठी ब्रिटिश व्हिसा मिळवला होता, असा आरोप तिच्यावर आहे.

सूत्रांनी सांगितले की, 'वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) पोलिस ठाण्यात 1 मार्च 2021 रोजी श्वेताविरोधात कलम 467, 468, 417, 418, 463 आणि 465 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कलम 467 हे जन्मठेपेच्या शिक्षेसाठी (14 वर्षे) आहे. त्यामुळे श्वेताला अटकपूर्व जामीन घ्यावा लागणार आहे, अन्यथा तिला अटक केली जाऊ शकते. वांद्रे कोर्ट महानगर दंडाधिकारी श्रीमती पीबी येरलेकर यांनी बीकेसी पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत."

सूत्रांनी सांगितल्यानुसार, "श्वेताचा मुलगा रेयांशला त्याच्या वडिलांपासून दूर नेण्याचा प्रयत्न सुरु आहे. अभिनवची परवानगी न घेता श्वेताला रेयांशला काही महिन्यांसाठी लंडनला घेऊन जायचे होते. यासाठी तिला रेयांशचा यूके व्हिसा मिळवायचा होता. त्यावेळी रेयांश अवघ्या 3 वर्षांचा होता आणि म्हणूनच व्हिसाच्या कागदपत्रांसाठी वडिलांच्या एनओसीची गरज असते. श्वेताने त्या एनओसीसाठी अभिनवची बनवाट स्वाक्षरी केली होती. याबद्दल समजताच अभिनवने ब्रिटीश व्हिसा डिपार्टमेंटमला एका ईमेलद्वारे कळवले होते. पण, तोपर्यंत व्हिसा तयार झाला होता. तेव्हा मुंबई अधिका-यांनी याचा तपास केला असता श्वेताने बनावट स्वाक्षरी केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर दोन दिवसांत रेयांशचा व्हिसा रद्द करण्यात आला होता."

अभिनवने सांगितली होते बनावट स्वाक्षरीविषयी...

ऑक्टोबर 2020 मध्ये दिव्य मराठीसोबत संवाद साधताना अभिनव कोहली या बनावट स्वाक्षरीबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, "श्वेताने माझी बनावट सही करुन रेयांशसाठी यूकेचा व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याबाबतचा कायदेशीर पुरावा माझ्याकडे आहे. श्वेताच्या एका मित्राने मला तिची योजना सांगितली होती. ती रेयांशला एकतर अमेरिकेत किंवा यूकेला घेऊन जाणार होती. या दोन्ही देशांच्या कायद्यानुसार मुलाच्या दोन्ही पालकांच्या स्वाक्षर्‍या असणे आवश्यक आहे. मी कोणत्याही एनओसीवर सही केली नव्हती. श्वेताने व्हिसाच्या अर्जावर माझी खोटी सही केली होती. सुदैवाने मी 15 दिवसांच्या आत दोन्ही देशांना पत्र लिहून यासंदर्भात कळवले. श्वेता कोणत्या थराला जाऊ शकते, याचा कुणीही अंदाज बांधू शकत नाही," असे अभिनव म्हणाला होता.

2010 पासून श्वेता अभिनेता अभिनव कोहलीला डेट करत होती. 3 वर्षांनंतर म्हणजे 13 जुलै 2003 रोजी दोघांनी लग्न केले होते.

बातम्या आणखी आहेत...