आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Shweta Tiwari’s Estranged Husband Abhinav Kohli Shares Video In Which Actress Is Seen Preventing Their Son Reyansh From Meeting Him

श्वेता-अभिनव यांच्यातील वाद चव्हाट्यावर:अभिनव कोहलीने मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती, व्हिडिओ शेअर करुन सांगितले श्वेता मुलाला भेटण्यापासून कशी रोखतेय

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनवने श्वेतावर मुलाला त्याच्यापासून दूर केले असून अज्ञात स्थळी नेल्याचा आरोप केला.

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा दुसरा पती अभिनव कोहली यांच्यातील वाद अद्याप शमलेला नाही. अभिनवने सोमवारी सोशल मीडियावर एकामागून एक पाच व्हिडिओ शेअर करुन श्वेता त्याच्या मुलाला भेटण्यापासून त्याला कशी रोखतेय, हे दाखवले आहे. श्वेताने मुलगा रेयांशला हॉटेलच्या एका खोलीत लपवून ठेवले होते, असा आरोप अभिनवने केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे केली विनंती

अभिनवने पहिल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "दुसर्‍याच्या नावावर तिने हॉटेलची रुम बुक केली होती. दुर्दैवाने, पोलिस एका बापाला आपल्या मुलाशी दोन क्षणदेखील भेट घडवून देऊ शकले नाहीत. तिने तेथूनदेखील पळ काढला, फार अडचणीतून त्यांचा शोध घेतला होता. उद्धव साहेब (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) आणि श्रीमती उद्धव साहेब कृपया हस्तक्षेप करा. एक वडील म्हणून मला खूप त्रास होत आहे. मुलाला भेटण्यास मला मदत करा", अशा आशयाची पोस्ट अभिनवने टाकली आहे.

'मी दारावर बेल वाजवत राहिलो'
व्हिडीओ शेअर करत अभिनवने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मला मुलाला थोडा वेळ भेटण्यास दिल्यानंतर ती त्याला घेऊन आत निघून गेली आणि त्याच दिवशी मी घराबाहेर बेल वाजत बसलो होतो. हा त्या दिवशी दुपारी केलेला व्हिडीओ आहे. माझा मुलगा रेयांश मला विचारत आहे त्या दिवशी मी दुपारी हॉटेलमध्ये नाही आलो’ असे कॅप्शन अभिनवने दिले आहे. तिसर्‍या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले- 'त्याच दिवशी.'

अभिनवने श्वेताला कायदेशीर नोटीस पाठवली आहे

अलीकडेच एका मुलाखतीत अभिनवने सांगितले की, त्याने श्वेताला कायदेशीर नोटीस पाठवली आहे, ज्याचे तिला 14 दिवसांच्या आत उत्तर द्यावे लागेल. तिने तसे न केल्यास तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

25 ऑक्टोबरपर्यंत अभिनव सोबत होता रेयांश
अभिनव सांगितल्यानुसार, श्वेता तिवारी कोरोना झाल्याने मुलगा रेयांश 40 दिवस त्याच्या सोबत होता. 25 ऑक्टोबरला श्वेता त्याला जबरदस्तीने आपल्यासोबत घेऊन गेली.

श्वेता तिवारीने पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही वेगळे राहात आहे.

बातम्या आणखी आहेत...