आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वेता तिवारीच्या एक्स-हसबंडचा आरोप:अभिनव कोहली म्हणाला - माझ्या मुलाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेऊन दक्षिण आफ्रिकेला गेली श्वेता, तिच्याविरोधात हायकोर्टात जाईल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारी खतरों के खिलाडीच्या 11 व्या पर्वासाठी सर्व स्पर्धकांसह दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये पोहोचली आहे. दरम्यान श्वेताचा दुसरा पती अभिनव कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत श्वेतावर काही गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाच्या दुस-या लाटेत श्वेता माझा मुलगा रेयांशला मुंबईतील एका हॉटेलमध्ये सोडून केपटाऊनला निघून गेली आहे, असे अभिनव म्हणाला आहे.

मुलाला एका हॉटेलमध्ये सोडून निघून गेली श्वेता
अभिनवने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. यात त्याने मुलगा रेयांशबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अभिनव या व्हिडिओत म्हणाला, 'श्वेता खतरों के खिलाडीसाठी साउथ अफ्रिकेला गेलीय. काही दिवसांपूर्वीच तिने रेयांशला घेऊन शोसाठी अफ्रिकेला जाण्यासाठी विचारले होते. मात्र काल मी तिच्या अफ्रिकेला जाण्याच्या पोस्ट पाहिल्या. जर ती अफ्रिकेला गेलीय तर माझा मुलगा कुठेय?' असा सवाल विचारत श्वेताने आमच्या मुलाला हॉटेलमध्ये एकट्याला ठेवल्याचा आरोप त्याने केलाय.

मी माझ्या मुलाला शोधतोय
अभिनव पुढे म्हणाला, 'आताच पोलिस स्टेशनला गेलो होतो. मात्र फार उपयोग झाला नाही. त्यांनी सांगितलं चिल्ड्रन वेलफेअर कमिटीमध्ये जा. सगळीकडून उडवाउडवीची उत्तर मिळत आहेत. मी फक्त माझ्या मुलाला शोधतोय. हॉटेलांमध्ये जाऊन त्याचा फोटो दाखवून माझा मुलगा इथे आहे का विचारत आहे.'

मुलगा सापडला नाही तर श्वेताविरोधात हायकोर्टात जाईल
अभिनव कोहली म्हणाला की, जर त्याला त्याचा मुलगा मिळाला नाही, तर तो श्वेताविरोधात हायकोर्टात जाईल. त्याने सांगितले की, दोन दिवसांपासून त्याचा मुलगा आजारी आहे. पण अशा स्थितीतही श्वेता मुलाला सोडून शोसाठी गेली आहे.

मुलाच्या कस्टडीवरुन सुरु आहेत वाद
श्वेता तिवारीने 2013 मध्ये अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केले होते. 2019 मध्ये दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहे. श्वेता आणि अभिनय ब-याच काळापासून मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी कोर्टात भांडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...