आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता सिद्धांत सूर्यवंशीचे निधन:जिममध्ये वर्कआउट करताना आला हृदयविकाराचा झटका, 'कसौटी जिंदगी की'मुळे मिळाली होती प्रसिद्धी

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे निधन झाले आहे. 46 वर्षीय सिद्धांतला जिममध्ये वर्कआऊट करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉक्टरांच्या टीमने तब्बल 45 मिनिटे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्याचे प्राण वाचवता आले नाही.

कुसुम, कसौटी जिंदगी की, कृष्णा-अर्जुन, जमीन से आसमान तक, क्या दिल में है, गृहस्थी यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये सिद्धांत झळकला होता. जिद्दी दिल माने ना या शोमध्ये तो शेवटचा दिसला होता. सिद्धांत हा फिटनेस फ्रीक होता, तो चाहत्यांना प्रेरित करण्यासाठी त्याचे वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असे.

जय भानुशालीने व्यक्त केला शोक
टीव्ही अभिनेता जय भानुशालीने सिद्धांतच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्याने सिद्धांतचा एक फोटो शेअर करत 'तू खूप लवकर निघून गेलास,' अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सिद्धांतने 2017 मध्ये मॉडेल आणि फॅशन कोरिओग्राफर अलिसिया राऊतशी लग्न केले होते आणि त्यांना दोन मुले आहेत. हे त्याचे दुसरे लग्न होते. यापूर्वी त्याने 2000 मध्ये इरा सूर्यवंशीसोबत लग्न केले होते, परंतु 2015 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.

अशा प्रकारची ही तिसरी घटना
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचाही जिममध्ये व्यायाम करताना अलीकडेच मृत्यू झाला. याआधी 'भाभीजी घर पर है' या मालिकेतील अभिनेता दिपेश भानचाही वर्कआउट करताना मृत्यू झाला होता.

कोण होता सिद्धांत वीर सूर्यवंशी?
सिद्धांत वीर सूर्यवंशीचा जन्म 15 डिसेंबर 1975 रोजी मुंबईत झाला. त्याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. सिद्धांतने 'कुसुम' या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. याशिवाय त्याने 'कसौटी जिंदगी की', 'कृष्णा अर्जुन', 'क्या दिल में है' सारख्या अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले. सिद्धांतला आनंद सूर्यवंशी या नावानेही ओळखले जात होते.

  • पाच वर्षांपूर्वी घटस्फोटित सुपरमॉडेलसोबत थाटला होता सिद्धांतने दुसरा संसार, पहिला झाला होता काडीमोड

सिद्धांतचे खरे नाव आनंद सूर्यवंशी होते. 2014 मध्ये काही कारणास्तव त्याने आपले नाव बदलून सिद्धांत सूर्यवंशी केले होते. 23 नोव्हेंबर 2017 रोजी त्याने त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड अलेसिया राऊतसोबत लग्न केले होते. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...