आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ सागरने स्वतः केले अफवांचे खंडन:म्हणाला - मी 'द कपिल शर्मा शो' सोडलेला नाही, अशा अफवा पसरवू नका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'द कपिल शर्मा शो' मागील 7 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या काळात अनेक कलाकारांनी या शोला अलविदा केला आहे. आता या शोमध्ये सेल्फी मौसी, उस्ताद, फनवीर सिंग आणि सागर पगलेटू यांसारख्या भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ सागरने 'द कपिल शर्मा शो'मधून काढता पाय घेतल्याची चर्चा रंगली होती. मानधनात वाढ न झाल्याने सिद्धार्थने शो सोडण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले गेले. मात्र आता स्वतः सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

इन्स्टाग्राम अकाउंटवर लाइव्ह येत सिद्धार्थ म्हणाला, "मी कपिल शर्मा शो सोडलेला नाही. माझे कपिल शर्माशी बोलणे झाले आहे. मी इथे तुमचे मनोरंजन करण्यासाठी आलोय. अशा अफवा कोठून पसरतात, हे ठाऊक नाही. कृपया अशा अफवा पसरवू नका," असे आवाहन सिद्धार्थने केले आहे.

फीमध्ये वाढ न केल्यामुळे सिद्धार्थने शो सोडला - पसरली होती अफवा
सिद्धार्थने कमी मानधनामुळे हा शो सोडला असल्याची चर्चा रंगली होती. सिद्धार्थला त्याच्या फीमध्ये वाढ करायची होती, पण निर्माते त्याच्या मानधनात वाढ करत नव्हते. यामुळे सिद्धार्थने शो सोडला, अशी अफवा पसरली होती.

सिद्धार्थ मुंबईहून दिल्लीला शिफ्ट झाला
'द कपिल शर्मा शो'च्या शूटिंगमुळे सिद्धार्थ मुंबईला शिफ्ट झाला होता, मात्र आता तो दिल्लीतील त्याच्या घरी परतला आहे. अशा परिस्थितीत सिद्धार्थ शोमध्ये परतणार नसल्याची चर्चा रंगली होती. पण आता स्वतः सिद्धार्थने या सर्व अफवांचे खंडन केले आहे.

कृष्णा अभिषेकने देखील शोमध्ये परतण्याचे दिले संकेत
काही काळापूर्वी कृष्णा अभिषेकने पत्रकार परिषदेत खुलासा केला होता की, तो आणि कपिल पुन्हा एकत्र येण्याचा विचार करत आहेत. कृष्णाने सांगितले की, त्याच्यात आणि कपिलमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकत्र काम करण्याचा विचार करत आहेत. द कपिल शर्मा शोच्या पुढील सीझनमध्ये कृष्णा पुनरागमन करू शकते, असे म्हटले जात आहे.

या सेलिब्रिटींनी ठोकला कपिल शर्मा शोला रामराम
सिद्धार्थच्या आधीही अनेक सेलिब्रिटींनी कपिल शर्मा शोला अलविदा केले आहे. यामध्ये कृष्णा अभिषेक, भारती सिंग, चंदन प्रभाकर, सुनील ग्रोवर, अली असगर आणि उपासना सिंग या कलाकारांच्या नावांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...