आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Sidharth Shukla Passes Away; Bollywood Reaction After Bigg Boss 13 Winner Sidharth Shukla Dies Of Heart Attack

सिद्धार्थ शुक्लाने घेतला जगाचा निरोप:बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा, टिस्का चोप्राने म्हटले - शेजारी होता, कधी-कधी सोबत वॉक करायचो, रितेश देशमुख म्हणाला - खूप लवकरच सोडून गेलास

मुंबई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाहत्यांसह संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

बिग बॉस 13 विजेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी मुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. हृदयविकाराचा झटका हा अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण असल्याचे म्हटले जाते. बालिका वधू या शोमधून प्रसिद्धी मिळवलेल्या सिद्धार्थची तगडी फॅन फॉलोइंग होती. त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.

सिद्धार्थची बातमी मिळताच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने शोक व्यक्त केला आणि लिहिले, 'तू खूप लवकर निघून गेलास. त्याच्या कुटुंबाला आणि जवळच्यांसोबत माझ्या संवेदना. लाखो लोकांनी त्याच्यावर प्रेम केले. सिद्धार्थ शुक्ला तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्मह्याला शांती मिळो. ओम शांती. '

सिद्धार्थचा फोटो शेअर करताना बॉलिवूड अभिनेत्री टिस्का चोप्राने लिहिले, 'स्तब्ध आहे, सिद्धार्थ माझा शेजारी आहे आणि कधीकधी सोबत वॉक कारायचो. सिद्धार्थ शुक्ला तुझ्या आत्म्यास शांती लाभो. आशा आहे मित्र आणि काकूंना तुला गमावण्याचे हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो'

सिद्धार्थच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना बॉलिवूड गायक टोनी कक्करने लिहिले, 'धक्का बसला! कोणीतरी मला सांगा की हे खोटे आहे, माझा त्यावर विश्वास बसत नाही.' गेल्या वर्षी सिद्धार्थ टोनी कक्करच्या शोना-शोना गाण्यात शहनाज गिलसोबत दिसला होता. हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते.'

अशोक पंडित यांनी लिहिले, 'माझा यावर विश्वास बसत नाही. ही दुःखद बातमी ऐकून माझे शब्द संपले. सर्वोत्कृष्ट अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (40) चे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हे कुटुंबासाठी आणि संपूर्ण इंडस्ट्रीसाठी अत्यंत दु: खद आहे. त्याच्या शोकाकुल कुटुंबासोबत माझी संवेदना. ओम शांती. '

सिंगर अरमान मलिक यांनी लिहिले, 'ही बातमी ऐकल्यानंतर मी प्रोसेस करु शकत नाहीये, हे खरे आहे का, प्लीज नाही नाही'

तारक मेहता का उल्टा चश्मामध्ये बबीताची भूमिका निभावत असलेल्या मुनमुन दत्ताने लिहिले, स्तब्ध आहे. माझ्या जवळ शुब्द नाहीत सिद्धार्थ शुक्ला.

बातम्या आणखी आहेत...