आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सारेगमप लिट्ल चॅम्प्स:गायिका नेहा कक्कर म्हणते, 'मैं घर वापस आ गयी!', या छोट्या स्पर्धकाची बनली चाहती

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या रक्षाबंधन स्पेशल एपिसोडमध्ये नेहाने तिच्या बहीणभावासोबत मंचावर हजेरी लावली.
Advertisement
Advertisement

‘झी टीव्ही’वरील लहान मुलांमधील गायनकलेचा शोध घेणा-या ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाच्या या आठवड्याच्या भागात गायिका नेहा कक्कर हजेरी लावली आहे. या आठवड्यात रक्षाबंधन स्पेशल एपिसोड रंगणार आहे. यानिमित्ताने नेहा तिच्या बहीणभावासोबत म्हणजेच सोनू कक्कर आणि टोनी कक्कर यांच्यासोबत मंचावर पोहोचली. गेली अनेक वर्षे या कार्यक्रमाशी निगडित राहिलेल्या नेहा कक्करने यावेळी आपल्या दोन्ही सहपरीक्षकांसह जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘सारेगमप लिटल चॅम्प्स’च्या 2017 च्या सीझनमध्ये तब्बल आठ महिने हा शो प्रसारित झाला होता. त्या सीझनमध्ये प्रथमच नेहाबरोबर हिमेश रेशमिया आणि जावेद अली हे परीक्षक म्हणून सहभागी झाले होते. या विशेष भागात या तिन्ही परीक्षकांची पुनर्भेट झाली, त्यामुळे नेहा कक्कर भारावून गेली. मध्यंतरीच्या काळात आपल्याला 2017 मधील सीझनमध्ये आपण या दोन्ही परीक्षकांबरोबर केलेली धमालमस्ती आणि त्यातील अतिशय गुणी बालगायक आणि त्यांचे सुरेल आवाज यांची खूप आठवण येत असल्याचे नेहाने सांगितले. तेव्हा हे तिन्ही परीक्षक एकमेकांची भरपूर चेष्टा करीत असत, तसेच त्यांनी काही अप्रतिम गाणीही गायली होती.

आता ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या नव्या भागात पुन्हा एकदा परीक्षक म्हणून सहभागी होत असल्याबद्दल नेहा कक्कर म्हणाली, “मला मी स्वगृही परत आले आहे, असंच वाटत आहे. मला सेटवर येण्याची खूप आठवण येत होती, पण आता आम्ही पुन्हा एकत्र आल्याचं पाहून मी अगदी भारावून गेले आहे.”

जावेद अली म्हणाला, “नेहा, हिमेश आणि माझ्यातील नात्यात कोणताही बदल झालेला नाही, हे पाहून मला प्रचंड आनंद झाला आहे. 2017 मध्ये आम्ही जिथे कार्यक्रम सोडला होता, तिथूनच पुन्हा सुरुवात करीत आहोत.”

  • आर्यनंदाची चाहती बनली नेहा

या कार्यकमातील प्रत्येक बालस्पर्धकाने आपल्या सुरेल आवाजाने कक्कर भावंडांवर आपला प्रभाव टाकला असला, तरी लहानग्या आर्यनंदाने विशेष करून नेहा कक्करचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. आर्यनंदाने ‘दंगल’ चित्रपटातील नेहाचे सुपरहिट गाणे ‘नैना…’ जसे गायले, ते ऐकून नेहाला तिची प्रशंसा केल्या वाचून राहावले नाही. “तुझं गाणं ऐकल्यावर दुसरा कोणताही गायक मनातून धास्तावूनच जाईल,” असे नेहाने तिला सांगितले. पण केवळ इतकेच बोलून ती थांबली नाही; तर आपण आर्यनंदाची चाहती बनलो आहोत, असे सांगून तिने तिच्याबरोबर एक सेल्फी ही काढला.

Advertisement
0