आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Single Mother Swaroopa Deshpande Won 1.6 Lakh Rupees, Amitabh Bachchan Gave Scholarship Of 5 Lakh For Daughter After Listening To Inspirational Story

केबीसी 12:सिंगल मदर स्वरूप देशपांडे यांनी जिंकले 1.6 लाख रुपये, प्रेरणादायी कहाणी ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मुलीला दिली 5 लाखांची शिष्यवृत्ती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वरूपा या सिंगल मदर असून त्यांनी या शोमध्ये 1 लाख 60 हजार रुपये जिंकले.

'कौन बनेगा करोडपती 12' या गेम रिअ‍ॅलिटी शोमध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांची प्रेरणादायी कहाणी बघायला मिळत आहे. अलीकडेच नवी मुंबईच्या स्वरूप देशपांडे अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर बसल्या होत्या. स्वरूपा या सिंगल मदर असून त्यांनी या शोमध्ये 1 लाख 60 हजार रुपये जिंकले. अमिताभ बच्चन यांनी त्यांना प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या मुलीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

फास्टेस्ट फिंगर फर्स्ट राऊंडमध्ये जलद आणि अचूक उत्तर देऊन स्वरूप देशपांडे हॉटसीटवर पोहोचल्या. 9 प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांनी आपल्या चारही लाइफलाइन वापरल्या होत्या.स्वरूपा दहाव्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकल्या नाहीत, म्हणून त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. स्वरूपा यांनी 1 लाख 60 हजार रुपये जिंकले. स्वरुपा यांनी अमिताभ यांना सांगितल्यानुसार, त्या पनवेलमध्ये राहात असून दोन्ही मुलांना एकट्याच वाढवत आहेत. आपल्या मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासोबतच स्वतःचे घर घेण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

स्वरुपा यांची उत्साहवर्धक कहाणी ऐकल्यानंतर अमिताभ प्रभावित झाले आणि म्हणाले, 'तुम्ही जे करत आहात ते ब-याच स्त्रियांसाठी प्रेरणा आहे. जिथे लग्न केले आहे तिथेच आयुष्य काढावे लागणार हे कधीकधी स्त्रियांसाठी एक ओझे बनते.' स्वरूपा या अनेक महिलांसाठी प्रेरणा असल्याचे सांगत अमिताभ यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर केली.

स्वरूपानंतर आता बिलासपूरची अंकिता सिंग या आठवड्यातील तिसरी स्पर्धक ठरली आहे. अंकिताने काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मंगळवारी वेळ संपल्यानंतर आता बुधवारच्या भागात त्या पुढचा खेळ खेळताना दिसतील.

बातम्या आणखी आहेत...