आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'साथ निभाना साथ 2' ही मालिका लवकरच स्टार प्लस वाहिनीवर सुरु होणार आहे. या नवीन पर्वात गोपी बहू (देवोलीना भट्टाचार्य) आणि कोकिलाबेन (रूपल पटेल) यांच्या व्यतिरिक्त काही नवीन चेहरेदेखील दिसणार आहेत. अलीकडेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रोमोत नवीन व्यक्तिरेखांची ओळख करुन देण्यात आली आहे. या मालिकेत गहना हे एक नवीन पात्र जोडले गेले आहे. ही भूमिका अभिनेत्री स्नेहा जैन साकारणार आहे. या मालिकेतील तिचे पात्र घरकाम करणा-या एका सामान्य मुलीचे आहे. हे पात्र अधिक वास्तविक दिसण्यासाठी अभिनेत्रीला तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करावे लागले आहे.
स्नेहा जैनचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस छायाचित्रांनी भरले होते. तर मालिकेत तिला अतिशय सामान्य मुलीचे पात्र साकारायचे आहे. यासंदर्भातील स्पॉटबॉयच्या एका वृत्तानुसार, शोची निर्माता रश्मी शर्मा यांनी स्नेहाला तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यास सांगितले, कारण प्रेक्षकांनी तिचा बोल्ड आणि स्टाइलिश लुक पाहू नये अशी रश्मी शर्मा इच्छा होती. आपल्या िनर्मात्यांचे म्हणणे ऐकून स्नेहाला आपले अकाउंट डिलीट केले आहे.
चॅनलने नुकताच या कार्यक्रमाचा नवीन प्रोमो रिलीज केला आहे. प्रोमोमध्ये देवोलीनाने गहना या नवीन पात्राची ओळख करून दिली. गहना ही मोदी कुटुंबातील एक नोकर आहे, जिच्याशी कुटुंबातील सर्व सदस्य वाईट वागतात. शोमध्ये हर्ष नागर हा अनंतची व्यक्तिरेखा साकारत असून तो अमेरिकेहून परतलेला असतो. गहनाला कुटुंबीयांकडून मिळालेली वागणूक बघून तो त्यांना अडवतो. मात्र कुटुंबातील सदस्य त्याच्या म्हणण्याकडे लक्ष देत नाहीत. शोमध्ये गहना आणि अनंतची लव्ह स्टोरी बघायला मिळेल.
View this post on InstagramA post shared by StarPlus (@starplus) on Oct 1, 2020 at 11:06am PDT
'साथ निभाना साथिया 2' ही मालिका 17 ऑक्टोबर रोजी स्टार प्लसवर सुरू होत आहे. ही मालिका 'ये रिश्ते है प्यार के' या मालिकेची जागा घेईल. मालिकेत देवोलीना, स्नेहा जैन आणि रूपल पटेल यांच्याशिवाय मोहम्मद नझीम अहमच्या भूमिकेत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.