आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Someone Is Learning To Make Carrot Pudding, While Someone Is Focusing On Writing, Like This TV Artists Are Spending Their Time

लॉकडाऊन:कोणी गाजराचा हलवा बनवायला शिकतय, तर कोणी लिहिण्यावर फोकस करतय, आपला वेळ असा घालवत आहेत टीव्ही कलाकार 

बॉलिवूड डेस्क3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनच्या काळात टीव्ही कलाकार अशाप्रकारे घालवत आहेत आपला वेळ...

किरण जैन

कोरोना महामारीमुळे देशभरात २१ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. यादरम्यान टीव्ही मालिका आिण चित्रपटांचे चित्रीकरणदेखील बंद आहे. अशावेळी इंडस्ट्रीचे कलाकारदेखील घरात राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीचे काही कलाकार या लॉकडाऊनच्या काळात आपला वेळ कसा घालवत आहेत हे दैनिक भास्करने त्यांच्याकडून जाणून घेतले. 

इंटरनेटवरून गाजराचा हलवा बनवायला शिकलो : सुनील ग्रोवर

इतरांसारखाच मीदेखील घरात स्वयंपाक करतो आहे. साफसफाई करत आहे आणि हो भांडीदेखील घासतो आहे. मी कधीच इतका व्यग्र नव्हतो. माझ्या घरी मोलकरीण नाही, त्यामुळे मीच घरातील सर्व कामे करतोय. मला आता कळतय की, कोणती डाळ शिजण्यासाठी किती शिट्ट्या घ्याव्या लागतात. आता मी इंटरनेटवरून गाजराचा हलवा बनवायला शिकलो आहे. याशिवाय कढई पनीर, भोपळा, भेंडीची भाजी, छोले-चावल, राजमा-पनीर सर्वकाही बनवायला शिकलो आहे. खरच, मला घरातील कामे सोडून इतर काहीही करण्यास वेळ मिळत नाही. मला माझ्या घरातील कामातून थोडा वेळ मिळाल्यास मी बातम्या पाहतो.

पुस्तके वाचण्याचा छंद सुरू आहे : श्रीती झा

मला पुस्तके वाचायला खूप आवडतात. मी कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी आिण कोठेही कांदबरी वाचू शकते. या लॉकडाऊन दरम्यान देखील मी हेच काम करतेय. सध्या कादंबरी वाचतेय. अशी काही पुस्तके आहेत जी माझ्या चाहत्यांसाठी सुचवू इच्छिते. अमितव घोष यांचे ‘द ग्रेट डीरेंजमेंट.’ जे साहित्य आम्ही वाचतो त्यात जग कशाप्रकारे निर्माण झाले हे या पुस्तकात सांगितले आहे. याशिवाय हार्पर ली यांचे ‘टू किल ए मॉकिंगबर्ड’पुस्तकदेखील मला आवडले. खरं तर हे पुस्तक ग्राफिक कादंबरी म्हणून उपलब्ध आहे आिण यावर आधारित ग्रेगरी पेक यांचा चित्रपटदेखील आला होता. याशिवाय ज्युलियन बार्न्सचे  ‘द ओनली स्टोरी’, ‘हाऊ टू चेंज योर माइंड’  वाचावे. 

लिखाणाची मजा घेत वेळ घालवतोय : वरुण बडोला

मी माझा वेळ लिखाण करून घालवतोय. व्यावसायिक लिखाणाशिवाय, मी फक्त लिहिण्याच्या कलेचा आनंद घेत आहे. ज्यावेळी तुम्ही काम करत नाही त्यावेळी ताण नसतो त्यामुळे लिहिण्यात मन रमते. सध्या मी  नेटफ्लिक्स एप्लॉइजसाठी वेब सिरीज लिहितोय. ज्या दिवशी लॉकडाऊन घोषित झाले होते त्याच दिवशी मी माझा मोबाइल बंद केला होता. याशिवाय मला हिंदी काल्पनिक कथा वाचायला आवडतात त्यामुळे मी काही आंतरराष्ट्रीय लेखकांची पुस्तकेदेखील वाचतोय. हिंदी साहित्यदेखील खूप रंजक आहे ती वाचायला पाहिजे, असे मला वाटते. लोकांनी अमृत लाल नागरची ‘नाच्यौ बहुत गोपाल’ आणि डॉक्टर राही मासूम यांचे ‘आधा गाव’ ही पुस्तके वाचावी असे मला वाटते. 

थ्रिलर सिरीज ‘होमलँड’पाहून वेळ घालवत आहे : निया शर्मा

मला वेब सिरीज पाहायला खूप आवडतात. बऱ्याच वेब सिरीज मला पाहायच्या होत्या, परंतु चित्रीकरणामुळे मला पाहता येत नव्हत्या. मी सध्या ‘होमलँड’थ्रीलर सिरीज जी इस्राइली सिरीज ‘प्रिजनर ऑफ वॉर’ वर आधािरत असलेल्या आंतरराष्ट्रीय मालिका पाहतेय. हा काळ मी खूप सकारात्मकतेत घालवते आहे. दिवसभर मी आईची मदत करते आणि वेब सिरीज पाहते. मला टीव्ही पाहायला जास्त आवडत नाही म्हणून जास्तीत जास्त वेळ मोबाइलवर घालवते.  


लूडो आिण कॅरमसारखे इनडोअर गेम खेळतोय :  राज अनाद
कत

चित्रीकरणामुळे आम्हाला घरात वेळ घालवायला मिळत नाही, परंतु आता घरात राहून खूप साऱ्या अॅक्टिव्हिटिज करतोय. चांगली झोप घेतोय, वेब सिरीज पाहतोय, कीबोर्ड वाजवायला शिकतोय आिण वर्कआऊट करण्यापासून कुटुंबासोबत वेळ घालवण्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट करतोय जी चित्रीकरणामुळे करू शकत नव्हतो. माझ्यासारखेच इनडोअर गेम खेळा आिण आनंद घ्या असे चाहत्यांना सांगायचे आहे. सध्या मी सापशिडीसारखे गेम खेळतोय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’देखील पाहतोय. 

बातम्या आणखी आहेत...