आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छोट्या पडद्यावर कमबॅक:सोनाली कुलकर्णी झळकणार छोट्या पडद्यावर, ‘क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’ या शोच्या सूत्रधाराची सांभाळणार धुरा

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 5 एप्रिल पासून सुरु होतोय नवा शो

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे. आता ती क्राइम पेट्रोल सतर्क या कार्यक्रमात सूत्रधाराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. क्राइम पेट्रोल सतर्क या शोच्या जस्टिस रिलोडेड या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली करणार असून या सीझनमध्ये व्यापक आणि गंभीर गुन्ह्याचे नाट्यमय सादरीकरण करण्यात आले आहे. एखाद्या गुन्ह्याविरोधात तक्रार दाखल करणे किती महत्त्वाचे असते, याबाबतही ती जागृती करताना दिसेल.

या नव्या भूमिकेबद्दल सोनाली कुलकर्णी म्हणाली, “मी नुकतेच ‘क्राइम पेट्रोल’ च्या टीमसोबत काम सुरु केले आहे. टीम खूप अप्रतिम आहे. अशा उत्साही आणि परिपूर्ण टीमसोबत काम करताना परफॉर्मरची उंची वाढते. माझ्यासाठी क्राइम पेट्रोल हा एक बॅटरीसारखा आहे. तो सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी अशा प्रकारच्या सापळ्यात अडकण्याऐवजी काय करावे, याबद्दल जबाबदार असले पाहिजे, यासाठी लोकांना सतर्क करण्याचे काम मी करणार आहे. चला सजग आणि जबाबदार बनूया.”

क्राइम पेट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड हा कार्यक्रम 5 एप्रिलपासून रात्री 11 वाजता सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...