आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्फर्म:5 वर्षानंतर सौम्या टंडनने 'भाबीजी घरी पर है' या मालिकेला केले अलविदा, 'बिग बॉस 14'मध्ये येणार असल्याच्या बातम्या केवळ अफवा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनिता भाबीच्या भूमिकेसाठी शेफाली जरीवालाचे नाव चर्चेत होते.

छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'भाबीजी घर पर है' या मालिकेत अनिता भाबीच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सौम्या टंडन. तब्बल 5 वर्षे सौम्याने ही भूमिका वठवली. मात्र आता यापुढे सौम्या या मालिकेत दिसणार नाहीये. कारण तिने आता ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दैनिक भास्करशी झालेल्या संभाषणादरम्यान सौम्याने या वृत्ताला दुजोरा दिला. तिने सांगितले की, ती गेल्या 5 वर्षांपासून या मालिकेशी जुळली होती, मात्र आता ती तिचा प्रवास इथेच थांबवत आहे. बिग बॉस 14 साठी सौम्याने ही मालिका सोडली अशी चर्चा होती, मात्र स्वतः सौम्याने याचे खंडन केले असून ही बातमी केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

  • मला आता माझ्या करिअरमध्ये पुढे जायचे आहे

सौम्या म्हणाली, "हा एक अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. मी हा कार्यक्रम पाच वर्षे केला आहे आणि पाच वर्षे मी ही भूमिका जगली आहे. मात्र आता यापुढील पाच वर्षे मला हीच भूमिका करायची इच्छा नाही. मला हे पात्र एक्सप्लोर करायचे होते तेवढे मी केले आहे आणि आता मला माझ्या करिअरमध्ये पुढे जायचे आहे. मला करिअरमध्ये पुढे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स करायचे आहेत. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप चांगले कंटेंट बनत आहेत, म्हणून आता मला माझ्या करिअरमध्ये काहीतरी नवीन करायचे आहे", असे सौम्याने सांगितले.

  • बेनिफर कोहलीसोबत चांगली मैत्री आहे - सौम्या

सौम्या पुढे म्हणाली, ‘माझ्या आयुष्यातील भाबीजी या मालिकेचा प्रवास अतिशय सुंदर होता. बेनिफर कोहली आणि संजय जी हे खूप चांगले निर्माते आहेत. त्यांनी मला कायम पाठिंबा दिला. मी आणि बेनिफर खूप चांगल्या मैत्रिणी आहोत’ असे सौम्याने म्हटले आहे. 21 ऑगस्ट रोजी सौम्या मालिकेतील तिच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण करणार आहे.

  • मला तिची खूप आठवण येईल, पण 'the show must go on': बेनिफर कोहली

सौम्याने मालिका सोडल्याविषयी मालिकेच्या निर्मात्या बेनिफर कोहली म्हणाल्या, ‘मालिका तर सुरु ठेवायला हवी. सौम्या ही माझी सर्वात आवडती अभिनेत्री आहे. ती तिच्या कामात अतिशय हुशार आहे आणि तिच्यासोबत काम करायला मिळाल्यामुळे मला आनंद झाला आहे. मी तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि भविष्यात आम्ही नक्कीच पुन्हा एकत्र काम करु. तिने गेली अनेक वर्षे या मालिकेत भूमिका साकारली आहे आणि आता ती माझी जवळची मैत्रीण आहे’, असे त्या म्हणाल्या.

पुढे त्यांनी सांगितले, ‘मला तिची खूप आठवण येईल. तसेच आमच्या दोघींमध्ये चागंले मैत्रीचे नाते असल्यामुळे मी तिला तिच्या जागी मालिकेत कोणती अभिनेत्री भूमिका साकारु शकते असेही विचारले आहे. तिने गेली बरीच वर्षे माझ्यासोबत काम केले त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानते.’

  • लवकरच नवीन अभिनेत्रीचा शोध सुरु करु

बेनिफर यांनी पुढे सांगितले की, अनिता भाबीच्या भूमिकेसाठी लवकरच नवीन अभिनेत्रीचा शोध सुरु करणार आहोत. काही नावे डोक्यात आहेत, मात्र अद्याप त्याविषयी वाहिनीशी चर्चा झालेली नाही. विशेष म्हणजे काही काळापूर्वी शोमध्ये अनिता भाबीच्या भूमिकेसाठी शेफाली जरीवालाचे नाव चर्चेत होते.

बातम्या आणखी आहेत...