आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Soumya Tandon Wept On Set On The Last Day Of Shooting , The Entire Team Of The Show Gave Farewell In An Emotional Style

भावूक क्षण:शूटिंगच्या शेवटच्या दिवशी सौम्या टंडनला अश्रू झाले अनावर, शोच्या संपूर्ण टीमने इमोशनल अंदाजात दिला निरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अलीकडेच सौम्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सेटवरील शेवटच्या दिवसाची झलक शेअर केली.

मागील पाच वर्षांपासून 'भाबीजी घर पर है' या मालिकेत अनिता भाबीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सौम्या टंडनने ही मालिका सोडली आहे. सौम्याने 21 ऑगस्ट रोजी या मालिकेच्या आपल्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण केले. यावेळी सर्व को-स्टार्सनी तिला इमोशनल गाणे गाऊन निरोप दिला. यावेळी को-स्टार आसिफ शेखविषयी बोलताना सौम्या एवढी भावूक झाली की, तिला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

अलीकडेच सौम्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सेटवरील शेवटच्या दिवसाची झलक शेअर केली. यात सौम्यासाठी तिच्या सर्व को-स्टार्सनी 'तुमको देखा तो ये ख्याल आया...' हे गाणे गायले. यानंतर सौम्याने फेअरवेल केक कापला. तिने या शोशी संबंधित आपला अनुभवदेखील शेअर केला.

सौम्याने टीमचे मानले आभार

सेटवरील काही व्हिडिओ शेअर करुन सौम्याने लिहिले, 'माझ्या सुंदर प्रवासाचा अंत. आम्ही या कार्यक्रमाचा भाग होतो आणि आमचे नाते खूप मजबूत होते. हे काही क्षण आहेत जे मी आयुष्यभर लक्षात ठेवेल.'

  • नवीन संधीसाठी सोडली मालिका

सौम्या भास्करसोबत झालेल्या बातचीतमध्ये म्हणाली, “हा एक अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. मी हा कार्यक्रम पाच वर्षे केला आणि पाच वर्षे मी ही भूमिका जगले आहे. मात्र आता यापुढील पाच वर्षे मला हीच भूमिका करायची इच्छा नाही. मला हे पात्र एक्सप्लोर करायचे होते तेवढे मी केले आहे आणि आता मला माझ्या करिअरमध्ये पुढे जायचे आहे. मला करिअरमध्ये पुढे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स करायचे आहेत. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप चांगले कंटेंट बनत आहेत, म्हणून आता मला माझ्या करिअरमध्ये काहीतरी नवीन करायचे आहे”, असे सौम्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...