आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Sudesh Bhosle, Who Sang 'Jumma Chumma' Said I Was Drunk 25 Cups Of Tea In 17 Hours Due To Fear Of Amitabh Bachchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुलासा:सुदेश भोसलेंनी सांगितले - अमिताभ बच्चन यांच्या भीतीने 'जुम्मा चुम्मा' गाणं गाण्यासाठी 17 तासांत 25 कप चहा प्यायलो होतो

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘जुम्मा चुम्मा’ या अतिशय लोकप्रिय गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा एक किस्साही सुदेश भोसले यांनी शेअर केला.

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’ या सांगितिक रिअ‍ॅलिटी शोच्या आगामी भागात प्रसिद्ध गायक सुदेश भोसले पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक प्रसिध्द अभिनेत्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करण्यासाठी सुदेश भोसले यांना ओळखले जाते. या कार्यक्रमातील त्यांनी गाजलेल्या ‘जुम्मा चुम्मा’ या अतिशय लोकप्रिय गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळचा एक किस्साही शेअर केला.

झैद अलीने ‘मेरे नैना सावन भादो’ हे गाणे अफलातून पध्दतीने सादर केल्यावर सूत्रसंचालक मनीष पॉलने सुदेशजींना मंचावर बोलावून ‘जुम्मा चुम्मा दे दे’ हे लोकप्रिय गाणे गाण्याची विनंती केली. गेल्या अनेक पिढ्यांमध्ये हे गाणे लोकप्रिय ठरले आहे. सुदेशजींनी सहजतेने आणि तितक्याच जोशपूर्ण पध्दतीने हे गाणे गायलेच, पण त्या गाण्याची तालीम करीत असताना आणि त्याचे ध्वनिमुद्रण करीत असतानाच्या वेळचा एक भन्नाट किस्साही शेअर केला.

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या सेटवर गायक सुदेश भोसले
‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या सेटवर गायक सुदेश भोसले

त्या किश्शाची आठवण सांगताना सुदेश भोसले म्हणाले, “या गाण्याच्या फायनल टेकची रिहर्सल सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झाली. मी तेव्हा नवखा होतो. आमचं ध्वनिमुद्रण होत होतं, त्याच्या शेजारच्याच स्टुडिओत अमितजींचं चित्रीकरण सुरू होतं आणि ते मधल्या ब्रेकमध्ये आमच्या इथे येत होते. मी तेव्हा नवखा असल्याने मला ते आले की दडपण येत असे. त्यामुळे त्या दिवशी मी काहीच खाल्ले नव्हते. तेव्हा मी 17 तासांच्या अवधीत तब्बल 25 कप चहा प्यायला. पण कविता कृष्णमूर्ती यांनी मला आधार दिला. अखेरीस पहाटे 2 वाजता या गाण्याचं अंतिम ध्वनिमुद्रण पार पडलं!”

‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या सेटवर होस्ट मनीष पॉलसोबत सुदेश भोसलेंनी ताल धरला.
‘सा रे ग म प लिटल चॅम्प्स’च्या सेटवर होस्ट मनीष पॉलसोबत सुदेश भोसलेंनी ताल धरला.

या कार्यक्रमात सुदेशजींनी शावा शावा, चलाओ नैनों से बाण रे, इमली का बूटा बेरी का पेडसह अनेक लोकप्रिय गाणी गायली.