आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही न्यूज:बॉयफ्रेंडसोबत काम करण्यासाठी सुगंधा मिश्राने सोडला 'बिग बॉस', सुनील ग्रोव्हरच्या शोमध्ये घेतली एंट्री

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुगंधा मिश्रा संकेत भोसलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

विनोदवीर सुनील ग्रोव्हरचा कमबॅक शो 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान' सुरु होण्याआधीच चर्चेत आहे. यात कलाकारांची गर्दी दिसून येईल. या शोमध्ये निर्मात्यांनी सुंगधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनाही घेतले आहे. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळेही ते चर्चेत आहेत. मात्र दोघांनी कधीच ही गोष्ट स्वीकारली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, या शोआधी सुंगधाला 'बिग बॉस 14' साठी संपर्क करण्यात आला होता. तिने आधी त्यात रस घेतला होता, मात्र नंतर तिला जेव्हा 'गँग्स ऑफ फिल्मिस्तान'साठी संपर्क करण्यात आला, तेव्हा तिने तो शो सोडला.

शोच्या निर्मात्यांनी सुगंधासह तिचा बॉयफ्रेंड संकेत भोसलेलाही संपर्क केला. त्यामुळे संकेतसोबत काम करण्यासाठी सुगंधाने बिग बॉस सोडल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...