आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोविडच्या काळात लग्न:सुगंधा मिश्राने जालंधरमध्ये डॉ. संकेत भोसलेसोबत थाटले लग्न, पाहुण्यांना लग्नस्थळी जाण्यापूर्वी करावी लागली अँटीजन टेस्ट

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाबमधील जालंदरमध्ये सुंगधा आणि संकेत यांच्या लग्नाचे विधी पार पडले.

कॉमेडियन आणि गायिका सुगंधा मिश्रा आणि संजय दत्तच्या मिमिक्रीसाठी लोकप्रिय असलेल्या डॉ. संकेत भोसले यांचे सोमवारी पंजाबच्या जालंधरमध्ये लग्न झाले. आता त्यांच्या लग्नाचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो त्यांची मैत्रीण प्रीती सिमोसने शेअर केला आहे. फोटो शेअर करताना प्रीतीने सुगंधा आणि संकेत यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वृत्तानुसार, सुगंधा आणि संकेत यांच्या लग्नात कोविड 19 च्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात आले. यावेळी, पाहुण्यांना लग्नस्थळी जाण्यापूर्वी अँटीजन टेस्ट करावी लागली. अगदी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सुगंधा आणि संकेतचा विवाहसोहळा पार पडला.

सुगंधाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. शनिवारी तिच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.
सुगंधाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर केले होते. शनिवारी तिच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.

डिसेंबरमध्ये सुरु झाली होती लग्नाची तयारी
अलीकडेच सुगंधाने एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने आपल्या लग्नासाठीचे बहुतेक शॉपिंग ऑनलाइन केले होते. सुगंधा म्हणाली होते, "मी लग्नांची बहुतांश
शॉपिंग ही ऑनलाइनच केली. मी डिसेंबरपासूनच माझ्या लग्नाची तयारी सुरु केली, यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मी माझ्या लग्नाच्या ड्रेसबद्दलही खूप उत्साही आहे. माझे लग्न 20 पाहुण्यांच्या
उपस्थितीत होत आहे, याने मला फारसा फरक पडणार नाही. पण लग्नात 10 किलो वजनाचा लहेंगा परिधान करायचा हे मी खूप पुर्वीपासून ठरवले होते."

'मेहंदी की रात' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.
'मेहंदी की रात' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले होते.

विनोदी अंदाजात संकेतने केले होते प्रपोज
सुगंधाने एका मुलाखतीत तिच्या आणि संकेतच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती, "संकेतने मला विनोदी अंदाजात प्रपोज केले होते. आम्ही एकत्र काम करत असताना एकेदिवशी त्याने मला अचानक लग्नाची मागणी घातली. आमच्या सोबतचे लोक पुर्वीपासूनच आम्हाला कपल समजू लागले होते. जेव्हा आम्ही दोघे एकत्र असायचो, तेव्हा सोबतचे लोक आम्हाला प्रायव्हसी मिळावी म्हणून तिथून निघून जायचे. यावर आता मला हसू येतं," असे सुगंधाने सांगितले होते.

कोण आहे डॉ. संकेत भोसले ?
डॉ. संकेत भोसले पेशाने डॉक्टर आणि कॉमेडियन आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या काही एपिसोडमध्ये संकेत अभिनेता संजय दत्तची मिमिक्री करताना दिसला होता. दिव्य मराठीसोबतच्या बातचीतमध्ये संकेतने सांगितले होते, "लहानपणापासूनच मला मिमिक्री करायला आवडते. लोक दिवाळीत नवीन कपडे खरेदी करायचे आणि मी 'हम आपके है कौन' चित्रपटातील ड्रेस, 'खलनायक'मधील कैद्याचे कपडे आणि वकिलाचे पोशाख खरेदी करायचो."

संकेत पुढे म्हणाला होता, "माझ्या आई-वडिलांना माझी मिमिक्री आवडायची. पण आयुष्यात अभ्यास करणे देखील खूप महत्वाचे आहे. म्हणून माझे वडील म्हणाले होते की, आधी अभ्यास कर, मग तुला जे पाहिजे ते कर. म्हणून मी एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर मी डर्मोलोजिस्टचा अभ्यास पूर्ण केला. मी एक स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर आहे," असे संकेतने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...