आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवीन मालिका:'स्टोरी 9 मंथ्स की' मालिकेतून सुकीर्ती कांडपाल करतेय स्मॉल स्क्रिनवर कमबॅक, भूमिकेविषयी म्हणतेय...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आलिया श्रॉफ या आधुनिक मुलीची ही गोष्ट आहे.

अभिनेत्री सुकीर्ती कांडपाल आता 'स्टोरी 9 मंथ्स की' या मालिकेतून आलिया श्रॉफच्या भूमिकेत छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. मालिकेची संकल्पना पुरोगामी आहे आणि IVF (इन व्हीट्रो फर्टीलायझेशन) च्या मदतीने सिंगल मदर होण्याची निवड करणार्‍या आलिया श्रॉफ या आधुनिक मुलीची ही गोष्ट आहे. सिंगल मदर होण्याचा तिचा निर्णय आणि त्यासाठी ती शोधत असलेला योग्य डोनर या भोवती हे कथानक गुंफलेले आहे.

स्वबळावर टेलिव्हिजन उद्योगात आपले स्थान निर्माण करणार्‍या सुकीर्तीला पडद्यावर ती साकारत असलेल्या आलिया श्रॉफमध्ये स्वतःचे साम्य दिसते. आलियामधले आयोजनाचे गुण आणि तिची धडाडी हे तिच्या कणखर व्यक्तिमत्त्वाचे विशेष तिला स्वतःमध्येही दिसतात. पडद्यावरील भूमिकेशी असलेले स्वतःचे साम्य सांगताना सुकीर्ती म्हणते, “मला वाटते, आलियाची व्यक्तिरेखा माझ्यासारखी आहे कारण अनेक प्रकारे आमच्यात साम्य आहे. ती जीवनात जोखीम पत्करायला घाबरत नाही. एखादी गोष्ट ठरवली की आलिया ती निर्धाराने पार पाडते. आलिया अत्यंत हिंमतवान आहे आणि आपल्या शर्तींवर ती जीवन जगते. आलिया श्रॉफच्या धडाडीत आणि महत्त्वाकांक्षेत मला माझी प्रतिमा दिसते.”

पुढे ती सांगते, “आलियाप्रमाणेच माझ्या जीवनातील ध्येयांबाबत मीही अशीच वेडी होते. करियर माझ्यासाठी केंद्रस्थानी होते, कामात माझी पुरेपूर निष्ठा होती आणि महत्त्वाचे म्हणजे, मी ही स्वतंत्र होते. माझ्या स्वातंत्र्याची मी कशाशीच तडजोड करू शकत नाही. पडद्यावर आलिया साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

'स्टोरी 9 मंथ्स की' ही मालिका 23 नोव्हेंबरपासून दर सोमवार ते गुरुवार रात्री 10:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत सुकीर्तीसह अक्षय मिश्रा महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser