आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमोनाची आपबिती:10 वर्षांपासून एंडोमेट्रिओसिस या आजाराशी लढत आहे सुमोना चक्रवर्ती, लॉकडाउनमुळे झाली बेरोजगार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या काय म्हणाली सुमोना...

'द कपिल शर्मा शो' या विनोदी कार्यक्रमात काम करणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने सध्या ती बेरोजगार असल्याचा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. इतकेच नाही तर गेल्या काही वर्षांपासून तिला एका गंभीर आजाराने ग्रासले असल्याचेही तिने सांगितले आहे. सुमोनाने सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट लिहून याचा खुलासा केला आणि स्वतःचा वर्कआउट करतानाचा एक फोटोही शेअर केला आहे. खूप दिवसांनंतर मी घरात वर्कआउट केला आहे, असे ती म्हणाली आहे.

सुमनोनाने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, लॉकडाउनचा काळ तिच्यासाठी सोपा नाही, कारण तिच्याकडे काम नाही. ती बेरोजगार आहे परंतु असे असूनही ती स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचा पोट भरु शकते. सुमोनाने पुढे सांगितले की, 'मी 2011 पासून एंडोमेट्रिओसिस या आजाराशी लढत आहे. या आजाराच्या चौथ्या स्टेजचा मी सामना करत आहे. चांगले जेवणे, व्यायाम आणि ताणवमुक्त आयुष्य यावरचा उपाय आहे.’

पुढे ती म्हणाली, ‘लॉकडाउन माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या कठीण होता. मी आज वर्कआऊट केला आणि मला बरे वाटले. आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या समस्यांना सामोरे जात असतो. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतोच.’

लोक माझी उपस्थितीसुद्धा विसरले आहेत: सुमोना
यापूर्वी सुमोनाने एका मुलाखतीत बेरोजगार असण्यामागचे कारण सांगितले होते. ती म्हणाली होती की, "मी लोकांमध्ये जास्त मिसळत नाही, किंवा पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायला मला फारसं आवडत नाही. शूटिंग नंतर एकतर घरी जाते किंवा मित्रांसमवेत वेळ घालवते. बरेच लोक माझी उपस्थिती विसरले आहेत. पण आता मला वाटत आहे की मला अभिनेत्री म्हणून माझे करिअर चालू ठेवायचे असेल तर माझी उपस्थिती टिकवून ठेवणे फार महत्वाचे आहे."

'लोकांमध्ये माझ्याबद्दल गैरसमज आहे'

32 वर्षीय सुमोनाने सांगितल्यानुसार, लोकांमध्ये तिच्याबद्दल गैरसमज आहेत. याविषयी ती म्हणाली होती, "लोकांना वाटते की मी विक्षिप्त आहे आणि अधिक मोबदल्याची मागणी करते. पण हे चुकीचे आहे. मी फक्त हेच सांगू इच्छिते की, मी एक अभिनेत्री आहे आणि माझ्या पात्रतेनुसार मी मानधन मागते. माझे पीआर कौशल्य त्या स्तराचे नाही आणि मला हे उशीरा समजले. आता मी अधिक चांगला दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांना भेटून, त्यांना फोन करून आणि मेसेज करून मी काम मागत आहे." कपिल शर्माच्या शोमधील भूरीच्या भूमिकेसाठी सुमोना प्रसिद्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...