आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनःप्रक्षेपण:स्टार प्लसवर ‘रामायण’ पहात आहेत शोचे लक्ष्मण सुनील लहरी, शूटिंगसंबंधित अनुभव केले शेअर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी सुनील यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे अनुभव शेअर करत आहेत.

रामानंद सागर यांची गाजलेली पौराणिक मालिका 'रामायण' दूरदर्शननंतर आता स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होत आहे. मालिकेचा पहिला भाग सोमवारी प्रसारित झाला. या मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहिरी हे मालिकेचे पुनःप्रक्षेपण एन्जॉय करत असून त्यांनी मालिकेसंदर्भातील अनुभव शेअर केले आहेत.

'शूटिंगच्या ठिकाणी काहीच नव्हते'

मंगळवारी सुनील यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ते मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे अनुभव शेअर करत आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, उमरगांवमध्ये या मालिकेचे शूटिंग करण्यात आले होते. शूटिंग लोकेशनच्या अवतीभोवती दुसरे काही नव्हते. तेथे लोक राहत नव्हते किंवा एकही दुकान नव्हते. ते सांगितले की, ते जेव्हा पहिल्या दिवशी सेटवर पोहोचले आणि त्यांनी आपले कॉश्ट्युम आणि मुकूट चेक केला, तर तो त्यांना फिट बसला नाही. नंतर मेकअप आर्टिस्ट आणि कॉश्च्युम डिझायनर्सनी ते रिपेअर केले.  

'दशरथ ज्या जंगलात दिसले होते, तो एक सुंदर बीच होता'

सुनील यांनी सांगितले की, पहिल्या एपिसोडमध्ये दशरथ संतानप्राप्तीचे उपाय जाणून घेण्यासाठी ऋषींकडे जातात. तेव्हा ते ज्या जंगलातून जात होते, तेथे एक सुंदर बीच होता. सुनील यांच्या म्हणण्यानुसार, बीच इतका सुंदर होता की, त्यांनी एवढा सुंदर बीच अजून कुठेही पाहिला नाही. 

रामायण 1987 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाले 

'रामायण' ही मालिका पहिल्यांदा 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाली होती. यावर्षी लॉकडाऊनमुळे 28 मार्चपासून दूरदर्शनवर मालिकेचे पुन्हा प्रक्षेपण करण्यात आले आणि मालिकेने यशाचे रेकॉर्ड प्रस्थापित केले. पहिल्या आठवड्यात 556 मिलियन व्युअरशिपसह या मालिकेने पाच वर्षांचा विक्रम मोडित काढत भारतातील सर्वाधिक बघितल्या गेलेल्या मालिकेचा मान पटकावल. 16 एप्रिल रोजी, 7.7 मिलियनहून अधिक व्युअरशिपसह एका दिवसात सर्वाधिक प्रेक्षकांचा जागतिक विक्रम नोंदविला. या शोमध्ये अरुण गोविल राम, दीपिका चिखलिया सीता आणि अरविंद त्रिवेदी रावणाच्या भूमिकेत झळकले होते. 

बातम्या आणखी आहेत...