आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालहान मुलांचा डान्स रिअॅलिटी शो सुपर डान्सरचे चौथे पर्व छोट्या पडद्यावर दाखल झाले आहे आणि ऑडिशन फेरीतच सादर झालेल्या अप्रतिम आणि अनोख्या नृत्य प्रतिभेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या नृत्य प्रतिभेचे प्रदर्शन करतानाच स्पर्धकांनी आपल्या व्यक्तीगत पण प्रेरणादायी गोष्टी देखील सांगितल्या, ज्या प्रेक्षकांच्या हृदयाला भिडल्या आहेत. अरुणाचल प्रदेशच्या कोसुमने लोकांकडून खूप अपमान सहन केला आहे, त्याची ओळख आणि रूप यावरून त्याच्यावर टीका केली जात असे.
परंतु, कोसुमने सुपर डान्सरची ऑडिशन दिल्यावर मात्र चित्र एकदम पालटले. अनेक लोकांनी त्यांचा संपर्क साधून त्याच्याबद्दल सहानुभूती आणि काळजी व्यक्त केली. कोसुमने देखील सांगितले की, त्याची शोमधल्या इतर स्पर्धकांशी मैत्री झाली आहे आणि इथे त्याला घरच्यासारखे वाटते आहे.
या वीकएंडला मेगा ऑडिशनमध्ये कोसुमच्या आईने सर्व परीक्षकांना खास पोशाख भेट दिला. शिल्पा शेट्टी कुंद्रा, गीता कपूर आणि अनुराग बसू या तिन्ही परीक्षकांना प्रेक्षक उत्साहाने तो पोशाख परिधान केलेला पाहतील. अरुणाचल प्रदेशहून आलेल्या कोसुमच्या आईने दिलेली ही भेट म्हणजे अरुणाचल प्रदेशचा पारंपरिक पोशाख आहे, कमरेभोवती लपेटलेला स्कर्ट, पारंपरिक पगडी आणि इतर दागिने. शिल्पा आणि गीता या सुंदर पोषाखात मोहक दिसल्या. खास आपल्यासाठी कोसुमच्या आईने पोशाख आणला आहे हे समजल्यावर गीता कपूर खूप आनंद झाल्या. हा आनंद व्यक्त करताना गीता म्हणाल्या, “मला वेगवेगळे पोशाख परिधान करायला आवडतात. अरुणाचल प्रदेशचा पारंपरिक पोशाख अगदी अनोखा आणि मोहक आहे. यातून त्या प्रदेशाची सदभिरुची आणि अलंकारांचे प्रेम व्यक्त होते. कोसुमच्या आईने माझी इच्छा पूर्ण केली.”
दुसरीकडे, शिल्पा शेट्टी कुंद्रा म्हणाली, “अरुणाचल प्रदेश हे राज्य वैविध्यपूर्ण सामाजिक संस्कृतींनी आणि सुंदर हँडलूम्सनी सुशोभित झाले आहे. या हस्तकलांमधील कला आणि बारकाई यातून त्या पोषाखांची गुणवत्ता दिसून येते. आम्हाला हे सुंदर पोशाख विचारपूर्वक भेट दिल्याबद्दल मी कोसुम आणि त्याच्या आईची आभारी आहे. मला या पोशाखात स्वतःला बघून समाधानच होत नाहीये.”
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.