आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Sushant Singh Rajput Will Be Seen Again On TV, In The Memory Of The Late Actor, His Popular Show 'Pavitra Rishta'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आठवणी:पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार सुशांत सिंह राजपूत, दिवंगत अभिनेत्याच्या आठवणीत पुन्हा सुरु होतेय लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता'

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेमुळे सुशांत घराघरात पोहोचला होता.
  • या मालिकेत सुशांतने मानव देशमुखची भूमिका साकारली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर झी अनमोल वाहिनी पुन्हा एकदा त्याची गाजलेली मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. वाहिनीने सुशांतला श्रद्धांजली म्हणून पवित्र रिश्ता ही मालिका पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  याच मालिकेमुळे सुशांत घराघरांत पोहोचला होता.

'पवित्र रिश्ता'मध्ये सुशांतने मानव देशमुखची भूमिका वठवली होती.  सुशांतची ही भूमिका खूप गाजली होती. आता या मालिकेच्या माध्यमातून चाहते पुन्हा एकदा आपल्या लाडक्या अभिनेत्याला छोट्या पडद्यावर बघू शकणार आहेत.

  • 'पवित्र रिश्ता'मध्ये दोघांची एक सुंदर प्रेमकथा चित्रीत केली गेली होती

'पवित्र रिश्ता' ही मालिका पुन्हा प्रसारित करणे ही सुशांतला भावनिक श्रद्धांजली ठरेल. या मालिकेमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन लोकांची एक सुंदर प्रेमकथा सांगितली गेली. मानव देशमुख एक सामान्य गॅरेज मेकॅनिक असून आपल्या कुटुंबातील एकटा कमाई करणारा आहे. तर अर्चना करंजकर (अंकिता लोखंडे) ही एक सामान्य मध्यमवर्गीय मुलगी आहे, जी आपल्या कुटुंबाला सर्वोच्च स्थान देते.

  • अनेक अडचणींवर मात देऊन मानव आणि अर्चनाचं होतं लग्न

अनेक अडचणींवर मात देत अखेर मानव आणि अर्चना लग्नाच्या बेडीत अडकतात. मात्र लग्नानंतर त्यांना नवीन संघर्षाला सामोरे जावे लागते. त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी संघर्ष आणि एकमेकांवरील अतुट प्रेम या मालिकेत दाखवले गेले आहे. सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी या मालिकेत मानव आणि अर्चनाची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यांच्यासह सविता प्रभूणे, पराग त्यागी आणि उषा नाडकर्णी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.  

बातम्या आणखी आहेत...