आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात:तारक मेहताच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट, 'सुंदर' नंतर 'भिडे' यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेत आत्माराम तुकाराम भिडे ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते मंदार चांदवादकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मंदार आणि त्यांचे कुटुंबीय होम क्वारंटाइन असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंदार यांनी सांगितले की, "माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे आणि मी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं घरातच उपचार घेत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या प्रत्येक नियमाचे काटेकोरपणे पालन करत आहे."

'सुंदर' ही कोरोना पॉझिटिव्ह
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील सुंदर लाल म्हणजे मयूर वकानी यांची कोरोना टेस्टसुद्धा काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...