आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता'च्या बबिता जीचा जर्मनीत अपघात:मुनमुन दत्ताच्या गुडघ्याला गंभीर दुखापत, ट्रिप अर्धवट सोडून घरी परतली

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता हिचा जर्मनीमध्ये अपघात झाला आणि आता ती घरी परतली आहे. खुद्द मुनमुनने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यासोबतच या अपघातामुळे तिच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याचे तिने सांगितले आहे.

आता मी घरी परतले आहे
मुनमुन दत्ताने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माझा जर्मनीमध्ये एक छोटासा अपघात झाला. माझ्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे मला माझा प्रवास मध्येच थांबवावा लागला आणि आता मी घरी परतले आहे.'

ही मुनमुनची सोशल मीडिया पोस्ट आहे.

मुनमुन काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी युरोपला गेली होती. या ट्रिपचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आता मुनमुनची ही पोस्ट पाहिल्यानंतर चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करत आहेत.

मुनमुन गेल्या आठवड्यातच युरोपला गेली होती

मुनमुनला प्रवास करायला आवडते आणि ती अनेकदा तिच्या आवडत्या ठिकाणांना भेट देत असते. तिने जवळपास आठवडाभरापूर्वीच युरोपचा दौरा सुरू केला होता, मात्र या अपघातामुळे तिला मध्येच घरी परतावे लागले आहे.

मुनमुनने 2004 मध्ये केला होता टीव्ही डेब्यू मुनमुन दत्ता ही पुण्याची रहिवासी आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर 2004 मध्ये तिने झी टीव्हीवरील 'हम सब बाराती' या मालिकेतून टीव्ही डेब्यू केला. नंतर ती 'मुंबई एक्सप्रेस', 'हॉलिडे' आणि 'ढिंचॅक एंटरप्राइज' या चित्रपटांमध्ये झळकली. मुनमुनच्या वडिलांचे निधन झाले असून ती आई आणि भावासोबत मुंबईत राहते.

बातम्या आणखी आहेत...