आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादाची किनार:मानधन थकवण्यापासून ते लैंगिक छळापर्यंत, सतत वादात राहिली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेशनल एलायंस फॉर दलित ह्यूमन राइट्स के

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. मागील 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण मालिका अनेक वादांमुळेदेखील चर्चेत राहिली. या शोमध्ये काम करणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवाल हिने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तिच्या लेखी तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते लवकरच या प्रकरणाशी संबंधित सर्वांचे जबाब नोंदवणार आहे. असितशिवाय जेनिफरने शोमधील इतर क्रू मेंबर्सवरही लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.

खंर तर तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे निर्माते एखाद्या वादामुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही निर्माते आणि अभिनेते वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत आले आहेत. चला तर मग अशा 5 मोठ्या घटनांविषयी जाणून घेऊया, ज्यामुळे हा शो नव्हे तर यातील कलाकार मंडळी आणि निर्माते चर्चेत राहिले...

जेनिफरने असित यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
जेनिफरने असित यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.

रोशन भाभींनी असित मोदींवर केला लैंगिक छळाचा आरोप
(मे 2023)
विवाद: शोमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. जेनिफरने दावा केला आहे की, ती मागील बऱ्याच काळापासून या त्रासाचा सामना करतेय. सुरुवातीला काम जाण्याच्या भीतीने तिने सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले, पण आता ती तसे करू शकत नाही. अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी शोचे शूटिंग थांबवले आहे. 6 मार्च रोजी तिचा शेवटचा भाग शूट केला होता.

स्पष्टीकरण: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी जेनिफरने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. जेनिफर प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ई टाइम्सशी संवाद साधताना असित कुमार म्हणाले, "या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. हे आरोप निराधार आहेत. खऱ्या आयुष्यात मी कसा आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. दिग्दर्शक आणि त्यांच्या टीमने जेनिफरला शो सोडण्यास सांगून, आम्ही तिला (जेनिफर) शोमधून आणि आमच्या टीममधून काढून टाकले होते. याबाबत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. लवकरच आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करू आणि आमची प्रोडक्शन टीम सर्व पुरावे आणि कागदपत्रांचा खुलासा करेल."

असित यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले.
असित यांनी त्यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले.

शैलेश लोढा यांनी असितवर केली कायदेशीर कारवाई
(एप्रिल 2023)
वाद : जेनिफर प्रकरणापूर्वी अभिनेता शैलेश लोढा यांच्या तक्रारीमुळे असित मोदी चर्चेत होते. या शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश यांनी एप्रिल 2022 मध्ये अचानक या शोचा निरोप घेतला. जानेवारी 2023 मध्ये, अनेक अहवालांनी दावा केला होता की, शैलेश यांना अद्याप त्यांची थकबाकी परत मिळाली नाही आणि शो सोडल्यानंतर 6 महिन्यांनंतरही त्यांना पैसे मिळालेले नाहीत.

जवळपास 1 वर्षापासून त्यांचे पैसे न मिळाल्याने शैलेश यांनी नुकतीच निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई केली. थकीत रक्कम परत न केल्याने त्यांनी असित आणि प्रोडक्शन कंपनीविरुद्ध खटला दाखल केला. शैलेश यांनी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे संपर्क साधला आहे आणि कलम 9 अंतर्गत कॉर्पोरेट इन्सॉल्वेंसी रेजोल्यूशन केस दाखल केली आहे, ज्यावर मे महिन्यात सुनावणी होणार आहे.

खुलासा : या वादावर स्पष्टीकरण देताना असित मोदी यांनी शैलेश यांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, काही महिन्यांपूर्वी त्यांना नोटीस मिळाली होती आणि त्याचे कारण समजू शकले नाही. असित यांनी दावा केला की, त्यांनी कधीही पैसे परत करण्यास नकार दिला नाही. असित यांनी अभिनेत्यावर आरोप केला की, शैलेश छोट्याशा वादातून नाराज झाले आहेत. एवढेच नाही तर कागदपत्रावर स्वाक्षरी करून पैसे घेण्यासाठी ते आलेच नाहीत.

शैलेश आणि असित यांच्यात वाद सुरूच होता. दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत.
शैलेश आणि असित यांच्यात वाद सुरूच होता. दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत.

नेहा मेहताची 6 महिन्यांचे मानधन थकले, निर्मात्यांवर लावले आरोप (एप्रिल 2022) विवाद: शोमध्ये अंजली भाभीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नेहा मेहताने 2020 मध्ये शोला अलविदा म्हटले. 2022 मध्ये अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, शो सोडल्यानंतर दोन वर्षानंतरही तिला 6 महिन्यांची फी मिळालेली नाही

स्पष्टीकरण : नेहाची ही मुलाखत खूप चर्चेत राहिली. मात्र, प्रोडक्शन हाऊसने एक निवेदन जारी करून तिने केलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. शोशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, नेहाच्या या वक्तव्यामुळे निर्माता असित मोदी दुखावले आहेत. नेहाने कोणालाही न सांगता शो सोडला आणि कोणाशीही संपर्क साधला नाही, असा दावा अधिकाऱ्याने केला आहे. प्रोडक्शन टीमने सांगितले की, त्यांनी नेहाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु अभिनेत्रीने प्रतिसाद दिला नाही. अधिकाऱ्यांनी आरोप केला की, नेहा शो सोडण्याशी संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी करू इच्छित नाही, त्यामुळे प्रोडक्शन हाऊस तिला पैसे देऊ शकत नाही.

नेहा जवळपास 12 वर्षे या शोचा भाग होती. यानंतर तिच्या जागी सुनैना फौजदारची निवड करण्यात आली.
नेहा जवळपास 12 वर्षे या शोचा भाग होती. यानंतर तिच्या जागी सुनैना फौजदारची निवड करण्यात आली.

बबिताच्या जातीवाचक शब्दांवरून झाला वाद, अभिनेत्रीला मागावी लागली माफी
(मे 2021)
वाद: शोमध्ये बबिताजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या जातीवाचक विधानामुळे चर्चेत आली होती. मुनमुनने तिच्या एका व्हिडिओमध्ये जातीवाचक अपशब्द वापरले होते, त्यानंतर तिच्यावर एससी आणि एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अभिनेत्री व्लॉगमध्ये तिचा व्हिडिओ शूट करण्यासाठी तयार होत होती. 11 मे 2021 रोजी नॅशनल अलायन्स फॉर दलित ह्युमन राइट्सचे रजत कलसन यांनी मुनमुनविरोधात तक्रार दाखल केली.

स्पष्टीकरण: सोशल मीडियावर वाईटरित्या ट्रोल झाल्यानंतर मुनमुनने कोर्टात तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती. ती म्हणाली होती- 'कोणाच्याही भावना दुखावण्याच्या, धमकावण्याच्या किंवा अपमानित करण्याच्या हेतूने हे विधान केले नाही.' आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे, असेही ती म्हणाली होती.

हे प्रकरण थेट शोशी संबंधित नव्हते. असे असूनही, प्रेक्षकांनी मुनमुनला तारक मेहता का उल्टा चष्मामधून काढून टाकण्याची मागणी केली. मुुनमुनने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचे अनेकांनी म्हटले होते.

मुनमुन दत्ता तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्टाइलमुळे अनेकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे.
मुनमुन दत्ता तिच्या बोल्ड आणि बिनधास्त स्टाइलमुळे अनेकदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे.

अडचणीत सापडले होते चंपक चाचा, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी निर्मात्यांना धमकावले
(मार्च 2020)
विवाद: शोशी संबंधित एक मोठा वाद खूप चर्चेत होता. शोमध्ये चंपक चाचाची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला होता. या वक्तव्यामुळे राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकी दिली होती. खरं तर, शोच्या एका एपिसोडमध्ये चंपकलाल म्हणजेच अमित यांनी हिंदी ही मुंबईची मुख्य भाषा असल्याचे सांगितले होते. ज्यावर मनसेने शोच्या निर्मात्यांवर महाराष्ट्रीयन लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर कार्यकर्त्यांनी मालिका बंद करण्याचा इशाराही दिला होता.

स्पष्टीकरण: शोच्या संपूर्ण टीमने नकळत प्रेक्षकांच्या दुखावल्याबद्दल त्यांची माफी मागितली होती.