आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तारक मेहता...'च्या टप्पूच्या वडिलांचे निधन:भव्य गांधीच्या वडिलांची कोरोनामुळे मालवली प्राणज्योत, 10 दिवसांपासून कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटमध्ये होते व्हेंटिलेटरवर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भव्यच्या वडिलांनी 11 मे रोजी अखेरचा श्वास घेतला.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीचे वडील विनोद गांधी यांचे निधन झाले आहे. मुंबईतील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विनोद गांधी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मागील दहा दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि दोन मुले निश्चित आणि भव्य असा परिवार आहे. त्यांचा थोरला मुलगा निश्चित विवाहित आहे, तर भव्यने सध्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे.

  • चुलत भावाच्या लग्नात व्हर्च्युअली सहभागी झाला होता भव्य

तारक मेहता का उल्ट चश्मा या मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा समय शाह हा भव्यच्या मावशीच्या मुलगा आहे. 9 मे रोजी समयच्या बहिणीचे लग्न होते. मात्र वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे त्याने या लग्नसोहळ्याला व्हर्चुअल पद्धतीने हजेरी लावली होती.

  • 4 वर्षांपूर्वी सोडली होती मालिका

भव्यने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत टप्पू ही भूमिका जवळपास नऊ वर्षे साकारली होती. त्याला या मालिकेने लोकप्रियता मिळवून दिली. 2008 पासून तो या मालिकेचा भाग होता. पण 2017 मध्ये त्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने काही गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. भव्यने ही मालिका सोडल्यानंतर राज आनंदकतने त्याची जागा घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...