आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये नवीन एंट्री:शोला मिळाला नवीन तारक मेहता, शैलेश लोढाला सचिन श्रॉफने केले रिप्लेस!

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणारे अभिनेता शैलेश लोढा यांनी काही महिन्यांपूर्वी हा शो सोडला. आता अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांना शैलेशची रिप्लेसमेंट मिळाली आहे. या शोमध्ये आता अभिनेता सचिन श्रॉफ तारक मेहताची भूमिका साकारताना दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

सचिनने शोचे शूटिंग सुरू केले आहे

या शोच्या जवळच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सचिन दोन दिवसांपासून शोचे शूटिंगही करत आहे. याप्रकरणी सचिनच्या बाजूने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, आता तारक मेहताच्या भूमिकेत सचिन श्रॉफला प्रेक्षकांना कितपत पसंती मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सचिन अखेरचा 'आश्रम'मध्ये दिसला होता.

सचिन हा भारतीय टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे आणि त्याने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तो शेवटचा ओटीटी प्रोजेक्ट 'आश्रम' आणि टीव्ही शो 'गुम है किसी के प्यार में' मध्ये दिसला होता.

शैलेश 14 वर्षांपासून कार्यक्रमाशी जोडले होते

शैलेशबद्दल सांगायचे तर, ते तब्बल 14 वर्ष 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कार्यक्रमाचा एक भाग होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शैलेश त्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर नाराज होता. सोबतच ते निर्मात्यांवर देखील नाराज होते. ते त्यांच्या तारखांचा योग्य वापर करू शकत नाहीत, असे त्यांचे म्हणणे होते. म्हणून त्यांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण ते मालिकेत काम करण्यास तयार झाले नाहीत.

या सेलिब्रिटींनी सोडला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'

दिशा वाकानी (दया भाभी), झील मेहता (सोनू), निधी भानुशाली (सोनू), भव्य गांधी (टप्पू), मोनिका भदौरिया (बावरी), गुरचरण सिंग (सोढी), लाल सिंग मान (सोढी), दिलखुश रिपोर्टर (रोशन सोढी), नेहा मेहता (अंजली भाभी) या कलाकारांनी यआधी शोचा निरोप घेतला. घनश्याम नायक (नट्टू काका) यांचे गेल्या वर्षी निधन झाले. तर 2018 मध्ये कवी कुमार आझाद (डॉ. हाथी) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

बातम्या आणखी आहेत...