आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' कायम चर्चेत असते. आता ही मालिका बबिता जीची भूमिका वठवणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या अफेअरमुळे चर्चेत आहे. या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा राज अनादकट आणि मुनमुन दत्ता ख-या आयुष्यात एकमेकांना डेट करत आहेत. विशेष म्हणजे या दोघांच्या वयात नऊ वर्षांचा फरक आहे. राज 24 वर्षांचा आहे तर मुनमुन 33 वर्षांची आहे.
'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या संपूर्ण टीमला माहित आहे दोघांच्या नात्याबद्दल
रिपोर्टनुसार, 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या सेटवर प्रत्येकाला मुनमुन दत्ता आणि राज अनादकत एकमेकांना डेट करत असल्याचे माहित आहे. मालिकेशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, दोघांच्या कुटुंबीयांनाही याबद्दल माहिती आहे.
सूत्राने सांगितल्यानुसार, त्यांची लव्हस्टोरी बरीच जुनी आहे. दोघेही त्यांच्या नात्याचा खूप आदर करतात. सेटवर कोणीही मुनमुन आणि राज यांना त्यांच्या नात्याबद्दल चिडवत नाही. हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करायला कधीही विसरत नाहीत.
मुनमुन आणि राज त्यांच्या नात्याबद्दल गंभीर आहेत. मात्र दोघांनी कधीही त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. दोघेही त्यांचे नाते स्वीकारत नाहीत किंवा त्याचे खंडनदेखील करत नाहीत.
2017 मध्ये झाली राजची मालिकेत एंट्री
राज अनादकट 2017 मध्ये या मालिकेचा भाग झाला. त्याने मालिकेत अभिनेता भव्या गांधीची जागा घेतली. मुंबईत जन्मलेल्या राजने 2016 'एक रिश्ता साझेदारी का' या मालिकेतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मार्च 2017 पर्यंत भव्य गांधींने 'तारक मेहता ...' मध्ये 'टप्पू'ची भूमिका साकारली होती.
मुनमुन दत्ता 2008 पासून 'तारक मेहता'चा भाग आहे
पुण्यात राहणारी मुनमुन दत्ता 2008 पासून 'तारक मेहता...'चा भाग आहेत. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2004 मध्ये झी टीव्हीवरील 'हम सब बाराती' या मालिकेद्वारे मुनमुनने टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केले. नंतर ती 'मुंबई एक्सप्रेस', 'हॉलिडे' आणि 'ढिंचॅक एंटरप्राइज' या चित्रपटांमध्ये दिसली. मुनमुनच्या वडिलांचे निधन झाले आहे आणि ती मुंबईत आई, भाऊबहीण आणि भाचीसोबत राहते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.