आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Raj Anadkat Slams Media And Trollers For Cooking Up False Stories About Him Linking To Munmun Dutta

तारक मेहता का उल्टा चश्मा:मुनमुन दत्तानंतर आता राज अनादकटने डेटिंगच्या बातम्यांवर दिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'जरा विचार करा... यामुळे माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो'

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुनमुन दत्तानेही राजसोबत तिचे नाव जोडले जात असल्याने संताप व्यक्त केला होता

अभिनेत्री मुनमुन दत्तानंतर आता अभिनेता राज अनादकटने डेटिंगच्या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुनमुन दत्ता आणि राज अनादकट रिलेशनशिपमध्ये असल्याच्या सुरु होत्या. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत मुनमुन बबिता अय्यरची तर राज टप्पूची भूमिका साकारतोय. मुनमुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिची प्रतिक्रिया दिली होती. आता राजही यावर भाष्य करत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे.

राजने लिहिले, ‘माझ्याबद्दल माझ्या संमतीशिवाय सातत्याने लिहित असलेल्या प्रत्येकासाठी... जरा विचार करा, तुमच्या या सगळ्या कथांमुळे माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो. अशा सगळ्या बातम्या लिहिणाऱ्या सगळ्यांनी तुमच्यात असलेली ही क्रिएटिव्हिटी इतर गोष्टींमध्ये वापरा, त्याच्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल. देवा त्यांना सद्बुद्धी दे,’ अशा आशयाची पोस्ट राजने शेअर केली आहे.

मुनमुन दत्तानेही राजसोबत तिचे नाव जोडले जात असल्याने संताप व्यक्त केला होता

मुनमुन दत्ताने लिहिले होते, 'एखाद्या व्यक्तीच्या खासगी आयुष्यावर काल्पनिक बातमी देण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले आहेत? तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या आयुष्यावर जो काही परिणाम होतो किंवा बदल होतो त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारणार आहात का? एखाद्या स्त्रीने नुकताच तिचा मुलगा किंवा मग प्रियकर गमावला असेल तरी तुम्ही त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढतात, हे सगळे फक्त तुम्ही तुमच्या टीआरपीसाठी करता. पाहिजे तसे वृत्त किंवा हवे ते हेडिंग देत तुम्ही कोणाच्या ही प्रतिष्ठेला धक्का देऊ शकतात, त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे.'

पुढे मुनमुन म्हणाली होती, ‘मी तुमच्या सगळ्यांकडून खूप चांगल्या अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, कमेंट सेक्शनमध्ये जो तुम्ही अश्लीलपणा केला आहे, एवढेच नाही तर आपला समाज कसा मागासलेल्या विचारांचा आहे हे कथित शिक्षकलेल्या लोकांनी दाखवले आहे. तुमच्या विनोदासाठी स्त्रियांना नेहमीच त्यांच्या वयावरून कमीपणा दाखवला जातो. तुमच्या या विनोदाचा समोरच्या व्यक्तीवर काही परिणाम होतो किंवा नाही याचे तुम्हाला काही वाटतं नाही. 13 वर्षांपासून तुमचे मनोरंजन करत आहे आणि माझी प्रतिष्ठा उद्वस्त करण्यासाठी तुम्हाला 13 मिनिटेदेखील लागली नाहीत. त्यामुळे पुढच्यावेळी जर कोणी नैराश्येचा सामना करत असेल किंवा स्वत: चा जीव घेण्याचा प्रयत्न करत असेल तर थांबून जरा विचार करा, हे सगळे तुमच्यामुळे तर झालेले नाही ना. आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय,’ अशी संतप्त प्रतिक्रिया मुनमुनने दिली होती.

बातम्या आणखी आहेत...