आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Writer Abhishek Makwana Found Dead In His Flat, His Family Claims He Was Being Blackmailed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टीव्ही इंडस्ट्रीत आत्महत्या:'तारक मेहता...'चे लेखक अभिषेक मकवाना फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले, कुटुंबीयांचा दावा-  सायबर फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळले होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही घटना 27 नोव्हेंबरची आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली आहे. वृत्तानुसार, ही घटना 27 नोव्हेंबरची आहे. परंतु कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या दाव्यानंतर आता ही माहिती माध्यमांसमोर आली आहे. सायबर फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अभिषेक यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

सुसाइड नोटमध्ये आर्थिक विवंचनेबद्दल लिहिले
मुंबई मिररच्या वृत्तानुसार, 27 नोव्हेंबरला अभिषेक यांचा मृतदेह त्यांच्या मुंबईस्थित फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी सांगितल्यानुसार, अभिषेक यांनी एक सुसाइड नोट लिहिली असून त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेविषयी सांगितले आहे. अभिषेक यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना काही लोकांचे फोन येत असून ते दावा करत आहेत की अभिषेक यांनी त्यांना लोकमध्ये गॅरेंटर बनवले होते. हे फसवे लोक आता कुटुंबीयांकडे पैसे परत मागत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

भावाला ईमेलद्वारे मिळाली फसवणूक झाल्याची माहिती
अभिषेक यांचा धाकटा भाऊ जेनिशने एका बातचीतमध्ये सांगितले की, "मी माझ्या भावाचा मेल तपासला. कारण त्याच्या मृत्यूनंतर मला वेगवेगळ्या क्रमांकावरून अनेक कॉल आले होते जे कर्जाचे पैसे परत मागत आहेत. एक फोन नंबर बांगलादेशात रजिस्टर्ड आहे. एक म्यानमारमध्ये आणि उर्वरित देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील आहे."

जेनिश पुढे म्हणाले, "ईमेल रेकॉर्डवरून मला समजले की माझ्या भावाने एका इजी लोन अॅपवरुन थोडे कर्ज घेतले होते, ज्यावर मोठ्या प्रमाणात व्याज आकारले गेले. जेव्हा मी त्यांच्यातील व्यवहार पाहिले तेव्हा मला कळले की माझ्या भावाने कर्जासाठी अर्ज न करताही, ते थोडे थोडे पैसे अकाउंटमध्ये पाठवत राहिले आणि त्याचा व्याज दर 30%आहे."

चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेथील अधिका-याच्या म्हणण्यानुसार अभिषेकच्या कुटुंबीयांनी त्यांना सर्व फोन नंबर दिले आहेत. अभिषेकच्या बँक खात्यातील व्यवहारांची चौकशी केली जात आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser