आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah’s Gogi Aka Samay Shah Files Police Complaint After Unknown Gang Attacks Him

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलाकाराला धमकी:'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'गोगी'ला गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी, बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता समय शाहच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आपला तपास सुरु केला आहे.
  • समयच्या कुटुंबीयांना त्याच्या जीवाची भीती वाटत आहे, लवकरात लवकर या प्रकरणी कारवाई व्हावी अशी त्यांची इच्छा आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या विनोदी मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाह याला काही गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी समयने मुंबईच्या बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

समय शाहने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले की, घराजवळ कधी एक गुंड तर कधी गुंडांचा ग्रुप मिळून त्याला शिवीगाळ करायचे आणि त्याला जीवे मारण्याची धमकी द्यायचे. काही दिवसांपूर्वी समय शूटिंगहून घरी परतत असताना त्याला या गुंडांनी रोखले आणि त्याला शिवीगाळ करू लागले. समयने घटनास्थळावरुन पोलिसांना फोन केला असता, पोलिस तिथे पोहोचेपर्यंत गुंडांनी तेथून पळ काढला. मात्र जाताना ‘तुला पाहून घेऊ’ अशी धमकी त्यांनी समयला दिली.

सीसीटीव्हीत कैद झाले आरोपी

धमकी देणारे हे लोक कोण आहेत आणि ते असे का करत आहेत, याची काहीच माहिती नसल्याचे समयने स्पष्ट केलं. इमारतीचे काही सीसीटीव्ही फुटेज त्याने पोलिसांना सोपवले आहे. मागील 15 दिवसांत तीन दान या टोळीने धमकावल्याचे आणि शिवीगाळ केल्याचे समयने पोलिसांना सांगितले आहे.

कुटुंबीयांना वाटतेय भीती

समयची आई नीमा शहा म्हणाल्या, "कोरोनामुळे सध्या आमचा ड्रायव्हर मुंबईत नाहीये. त्यामुळे शूटिंगवर समय खासगी कॅबमधून येतो जातो. म्हणूनच त्यांना आपल्या मुलाबद्दल खूपच चिंता आहे. सीसीटीव्हीमध्ये चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे आणि पुढच्या वेळी असे काही घडल्यास तत्काळ कळवण्यास सांगितले आहे.''