आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • Tannaz Irani's Eyeget Injured While Playing In The Park With Daughter, Put On Band Aid And Shot After Two Days, Said 'Life Goes On'

अपना टाइम भी आएगा:मुलीसोबत पार्कमध्ये खेळताना तनाझ इराणीच्या डोळ्यांना झाली दुखापत, दोन दिवसांनी चित्रीकरणावर परतल्यानंतर म्हणाली - 'झालं-गेलं विसरून पुढे जावच लागतं'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघाताच्या दोन दिवसांनीच पुन्हा एकदा 'अपना टाइम भी आएगा' या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली.

आठवडाभरापूर्वी टीव्ही अभिनेत्री तनाझ इराणी हिच्यासोबत एक छोटा अपघात घडला. आपल्या मुलीबरोबर आयर्न जंगल जिममध्ये खेळत असताना तिच्या एका डोळ्याच्या पापणीला दुखापत झाली. सुदैवाने तिचे शेजारी लगेचच तिच्या मदतीला धावले आणि त्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. तनाझ आता दुखण्यातून सावरत असली, तरी अशा अपघातांमुळे आपल्या भूमिकेचे चित्रीकरण थांबवून ठेवणारी ती अभिनेत्री नाही. तिने अपघाताच्या दोन दिवसांनीच पुन्हा एकदा अपना टाइम भी आएगा या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. तिने आणि तिच्या टीमने पुरेशी खबरदारी घेतली असून आपल्या भूमिकेचे चित्रीकरण करताना ती आपली वेदना विसरण्याचा प्रयत्न करीत आहे.

आपल्याला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे भारावून गेलेली तनाझ इराणी म्हणाली, “मी चित्रीकरणाला प्रारंभ केला असून सेटवर पुन्हा कामाला सुरुवात केल्यावर मला खरोखरच खूप बरं वाटलं. या कोरोना साथीच्या काळात मी एक धडा शिकले आणि तो म्हणजे जीवन हे एका क्षणी खूप सुंदर आणि छान असतं आणि दुसर्‍्याच क्षणी त्याच्या अगदी विरुध्द परिस्थिती निर्माण होऊ शकते. तरीही जीवन पुढे सुरूच राहतं. त्यामुळे प्रत्येकालाच झालं-गेलं विसरून पुढे सरकावंच लागतं. या दुखापतीनंतर मला काही काळ चित्रीकरणापासून दूर राहण्याचा सल्ला माझ्या कुटुंबियांनी दिला नाही, याचा मला खूप आनंद झाला आहे. किंबहुना बख्तियारनेच मला पुन्हा काम सुरू करण्याचा सल्ला दिला. कारण त्याच्या मते ही जखम दोन दिवसात भरून निघाली असती. मी त्याचा हा सल्ला मानला, याचा मला आनंद वाटतो. त्याचा आत्मविश्वास आणि पाठिंब्यानेच मला हुरूप दिला. तेव्हा मी आमच्या टीमशी चर्चा केली आणि या स्थितीत त्यांची आणि माझी गरज भागेल, असे बदल पटकथेत करण्याची सूचना केली. तुम्हाला तुमच्या घरातून जो मानसिक आधार मिळतो, त्यामुळेच तुम्ही आत्मविश्वासपूर्वक आपल्या कामात पुढे जाऊ शकता.”

तनाझ पुढे म्हणाली, “मी जेव्हा सेटवर आले, तेव्हा सर्वांनाच माझ्याबद्दल काळजी वाटत होती आणि त्यांनी मला त्यांच्यापरीने पूर्ण आधार आणि पाठिंबा दिला. किंबहुना माझी टीम माझी काळजी घेण्यासाठी नेहमीच तत्पर असते आणि मी माझी औषधं वेळेवर घेते की नाही, त्यावरही ते लक्ष ठेवतात. काम करीत असताना मला कोणतीही शारीरिक किंवा मानसिक चिंता लागून राहणार नाही, याची ते खबरदारी घेतात. तसंच माझे चाहते माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव करीत आहेत, त्याबद्दलही मी त्यांची आभारी आहे. त्यांना माझ्याबद्दल वाटत असलेली काळजी पाहून मला खूप बरं वाटतं आणि त्यांच्याकडून इतकं प्रेम आणि काळजी मला लाभावी, यासाठी मी नक्कीच काहीतरी पुण्याचं काम केलं असणार. यामुळे आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. शिवाय शक्तिशाली महिला, प्रेरणादायक राणीसा, ताकदवान महिला यासारख्या शब्दप्रयोगांमुळेही माझी मानसिक इच्छाशक्ती भक्कम होते. त्यांना माझे मनापासून आभार!”

काय आहे तनाझच्या नवीन मालिकेची कथा
झी टीव्ही वाहिनीवर 20 ऑक्टोबर पासून नव्याने दाखल झालेली ‘अपना टाइम भी आएगा’ ही मालिका राणी नावाच्या एका तरुण मुलीची प्रेरणादायक कथा आहे. जयपूरमधील राजावत या एका श्रीमंत कुटुंबात मुख्य नोकर म्हणून काम करणा-या माणसाची राणी ही मुलगी असते. ही मुलगी आपल्या वडिलांच्या या सामाजिक स्थानाच्या वर जाण्यासाठी प्रयत्न करते. त्यासाठी अंगच्या बुध्दिमत्तेचा आणि गुणांचा वापर करून आपल्या या सामाजिक स्थानाच्या वर जाताना ती आपले नशीब आपल्या हातांनी घडविते आणि समाजातील प्रतिष्ठित वर्तुळात सन्मानाने प्रवेश मिळविण्याची मनिषा बाळगते. तिच्या वडिलांनी तिला प्रेमाने दिलेले ‘राणी’ हे नाव सार्थ करून त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी ती धडपड करते. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आणि सोशल माध्यमांवर सक्रिय असलेली अनुष्का सेन ही या मालिकेत प्रथमच नायिका राणीची भूमिका साकारीत आहे. त्याचप्रमाणे महाराणी राजेश्वरी सिंह रावतच्या भूमिकेत तनाझ इराणी आहे.

पडद्यावर प्रथमच एक खलनायिकेची भूमिका साकारता येणार असल्याने आनंदित झालेल्या तनाझने आपल्या या शाही घराण्यातील गर्विष्ठ महिलेच्या भूमिकेचा सखोल अभ्यास केला आहे.

बातम्या आणखी आहेत...