आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये टप्पू म्हणजेच राज अनादकट हा शो सोडत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता नुकतीच राजने या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत राज म्हणाला की, त्याला सध्यातरी ही गोष्ट सस्पेन्स ठेवायची आहे. योग्य वेळ आल्यावर मी चाहत्यांना याविषयी अपडेट देईल, असे तो म्हणाला आहे.
राजला सस्पेंस कायम ठेवायचा आहे
राज अनादकटला त्याने हा शो सोडला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तो म्हणाला की, "माझे चाहते, माझे प्रेक्षक, माझे हितचिंतक, या सर्वांना माहित आहे की, मला सस्पेन्स निर्माण करायला आवडतो. मी सस्पेन्स तयार करण्यात माहिर आहे."
योग्य वेळ आल्यावर कळेल - राज
'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा सस्पेन्स कधी संपवणार असा प्रश्न राजला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला होता, "काहीही घडले तरी , मी माझ्या चाहत्यांना अपडेट देईल. योग्य वेळ आल्यावर सर्वांना त्याबद्दल कळेल." यानंतर राजला विचारणा झाली होती की, या बातम्या त्याला डिस्टर्ब करतात का, तर यावर तो म्हणाला होता की, "नाही, या बातम्यांचा त्याला अजिबात त्रास होता नाही आणि संयमाचे फळ नेहमी गोड असते."
अनेक दिवसांपासून राज सेटवर दिसत नसल्याचे भिडे म्हणाले होते
यापूर्वी मंदार चांदवडकर उर्फ भिडे यांना राज शो सोडतोय का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, "होय, त्याला तब्येतीचा काही त्रास जाणवतोय तो बऱ्याच दिवसांपासून शूटवर येत नाहीये. पण त्याने शो सोडला आहे की नाही हे मला माहीत नाहीये."
राजचा म्युझिक व्हिडिओ
राज अनादकट नुकताच त्याची बहीण आणि आईसोबत दुबईच्या सहलीला गेला होता. राज लवकरच 'सॉरी सॉरी' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहे. या गाण्यात त्याच्यासोबत टीव्ही अभिनेत्री कनिका मानही दिसणार आहे. राजने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, तो त्याच्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहे आणि अखेर त्याने या गाण्याची घोषणा केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.