आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमेडियनची वेदना:एकटेपणा आणि कर्जबाजारीमुळे विष प्राशन करुन तीर्थानंदचा आत्महत्येचा प्रयत्न, 'द कपिल शर्मा शो'मध्ये केले होते काम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीर्थानंदने टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारण सांगितले

टीव्हीवरील लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये काम करणारा अभिनेता तीर्थानंदने 27 डिसेंबरच्या संध्याकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब त्याच्या शेजाऱ्यांना समजताच त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले आणि तेथे दाखल केले. चार दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर तीर्थानंद आता बरा असून घरी परतला आहे. तीर्थानंद पंधरा वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असून त्याला नाना पाटेकर यांचा लूक लाइक देखील म्हटले जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान तीर्थानंदने सांगितले की, समस्या आणि कुटुंब सोबत नसल्यामुळे त्याने हे पाऊल उचलले होते.

तीर्थानंदने टोकाचे पाऊल उचलण्यामागील कारण सांगितले
तीर्थानंद म्हणाला, "होय, मी विष प्राशन केले होते आणि मी याबद्दल खूप गंभीर होतो. आर्थिक समस्यांसोबतच माझे कुटुंबीयही मला सोडून गेले आहेत. मी रुग्णालयात होतो, पण त्यावेळी माझी आई आणि भाऊ मला भेटायला आले होते. आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो आणि मी पंधरा वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे. पण माझे कुटुंब माझ्याशी बोलत नाही. त्यांनी माझ्या उपचारात एक पैसाही खर्च केला नाही. मी कर्जबाजारी आहे. हॉस्पिटलमधूनही आल्यावरही मी घरी एकटीच राहतो. यापेक्षा कोणासाठी वाईट काय असू शकते. माझ्या आईने आजपर्यंत मला खायलाही विचारले नाही. माझी बायको सुद्धा डान्सर होती. आम्हाला एक मुलगी पण आहे, पण माझ्या बायकोचे पुन्हा लग्न झाले आहे. माझ्या मुलीचेही लग्न झाले आहे आणि तिचाही माझ्याशी काही संबंध नाही.'

तीर्थानंद आता हिम्मत हारणार नाही
तीर्थानंद पुढे म्हणाला, "मी माझे कुटुंब आणि काम यात गोंधळलो आहे. यातून कसे बाहेर पडावे हेच समजत नाही. इथे कोरोनामुळे कामही बंद आहे, आणि मी घर आता खायला उठलं आहे. त्यामुळेच मी टोकाचा निर्णय घेतला होता. मात्र, पोलिस, डॉक्टर आणि मित्रांनी समजूत घातल्यानंतर मी पुन्हा असे काम करणार नाही. आता मी हार मानणार नाही. मी बेशुद्ध पडल्यावर डॉक्टरांनी पोलिसांना बोलावले होते. घरच्यांचे वागणे बघून पोलिसही अवाक् झाले होते. ते माझा सख्खे आहेत, यावर त्यांचा विश्वास बसला नव्हता. मी पोलिसांकडे माफी मागितली आहे आणि आता मला काम मिळवायचे आहे आणि माझी आवडीचे जोपासायची आहे."

तीर्थानंद गेल्या 15 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे
तीर्थानंद म्हणाला, "मी विरारचा आहे. मला अभिनयाची आवड होती आणि मी गेल्या 15 वर्षांपासून अभिनय करत आहे. या कामाने मला खूप काही दिले आहे. ब्रँडेड कपडे, चांगला पैसा प्रवास मी सर्व काही पाहिले आहे, पण मी शून्यावर परतलो आहे. मी 8 वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केले आहे. मला इंडस्ट्रीमध्ये नाना पाटेकरांचा लूक अ लाइक म्हणतात. मी त्यांची नक्कल करायचो, त्यामुळे माझी इमेजही नाना पाटेकरांचा डुप्लिकेट अशी झाली आहे, अलीकडे माझा शिमारो मी वर एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. माझे पात्र एक इन्स्पेक्टर आहे. माझ्या कामाचे कौतुक होत आहे, पण कौतुकाने पोट भरत नाही. निर्मात्यांनी मला अजून पैसे दिलेले नाहीत."

बरे झाल्यानंतर तीर्थानंद कपिल शर्माकडे काम मागणार
तीर्थानंद पुढे सांगतो, "मी कॉमेडी सर्कस के अजुबेचा एक भाग होते. तिथे मी श्वेता तिवारी, कपिल शर्मा यांसारख्या लोकांसोबत काम करायचो. 2016 मध्ये, मी कपिल शर्माच्या काही शोमध्ये काम केले होते. जेव्हा कपिल आणि सुनीलमध्ये भांडण झाले होते, त्याकाळात कपिलने मला एका भूमिकेसाठी बोलावले होते. पण त्यावेळी मी गुजराती चित्रपट करत होतो. कामाच्या कमिटमेंट्समुळे मी कपिलच्या शोमध्ये सहभागी होऊ शकलो नाही. आता जेव्हा माझी तब्येत ठीक होईल, तेव्हा मी त्याच्याकडे काम मागेल."

बातम्या आणखी आहेत...