आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सर्व टीव्ही शोचे चित्रीकरण बंद पडले. त्यामुळे पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. आता बातमी आहे की, लोकप्रिय टीव्ही शो 'भाभीजी घर पर हैं'च्या टीमला आतापर्यंत उर्वरित पेमेंट मिळालेले नाही. या प्रकरणात शोची प्रमुख अभिनेत्री सौम्या टंडनने व्यथा व्यक्त केली आहे.
अलीकडेच पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सौम्या म्हणाली, 'माझं बरंच पेमेंट शिल्लक आहे, जे अजून मला मिळालेले नाही. मी निर्मिती संस्थेवर शंका घेत नाहीये, मला खात्री आहे की ते लवकरच मला मिळेल. काही कलाकारांना वेळेत पैसे मिळाले नाही तर त्यांना फारसा फरक पडत नाही, पण ब-याच जणांवर त्याचा परिणाम होतो. त्यांना घरभाडे द्यावे लागते, कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते. पेमेंट रखडले आहे, याचे वाईट वाटते.'
ती पुढे म्हणाली, 'बरेच लोक म्हणतात की, चॅनलला जाहिराती मिळत नाहीये. त्यांच्याकडेही पैसे नाहीत, परंतु आमचे पैसे त्या कामाचे आहे, जे आम्ही करुन चुकलो आहोत. आम्ही 90 दिवसांच्या क्रेडिट कालावधीवर काम करतो. आमच्या कामाचा महसूल निर्मात्यांना आधीच मिळाला आहे, त्यामुळे त्यांनी पेमेंट क्लिअर करायला हवी. मी स्वतःचा आर्थिक भार उचलण्यास सक्षम आहे, पण अनेकजण पैशाअभावी जगू शकत नाहीत.'
पगारात कपात होईल
लॉकडाऊनमुळे अनेक वाहिन्यांचे नुकसान झाले आहे, त्यानंतर बरेच निर्माते त्यांच्या बजेटमध्ये कपात करत आहेत. याविषयी सौम्या सांगते, 'मला याविषयी विचारले गेले आहे. मी अद्याप माझे पूर्ण पेमेंट मिळण्याची वाट बघत आहे. आणि सोबतच आता पुढे काय करायचे, हे प्रॉडक्शनकडून मला स्पष्ट व्हायचे आहे. हे सर्व येत्या 10 दिवसांत स्पष्ट होईल.'
कलावंत, युनिटची कोविड तपासणी करायला हवी
सौम्या म्हणाली, आपल्या महाराष्ट्र सरकारने 16 पानांची गाइडलाइन दिली आहे. यात खूप खबरदारी घ्यायचे सांगितले आहे. मात्र, यात मला दोन महत्त्वाचे मुद्दे दिसत नाहीत. सर्वप्रथम निर्माते या सर्व गाइडलाइन्सचे पालन करत आहेत की नाही, हे काेण पाहणार? दुसरी गोष्ट 33 टक्के टीमसोबत चित्रीकरण करण्याची परवानगी आहे, परंतु हे युनिट जे सेटवर राहूनच चित्रीकरण करणार आहे, ते काय कोविडमुक्त आहेत? या गोष्टींची शहानिशा करणे खूप गरजेचे आहे. आम्ही ज्या कलाकारांसोबत काम करत आहोेत ते पॉझिटिव्ह आहेत किंवा नाहीत हे कसे कळणार? माझी निर्मात्यांना एकच विनंती आहे की, जर तुम्ही कलावंतांंना आणि दुसऱ्या युनिटला चित्रीकरणासाठी बोलवत आहात तर सर्वप्रथम त्यांची कोविड तपासणी करावी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.