आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • The Guard Did Not Recognize The Guest Of Kapil Sharma's Show, Union Minister Smriti Irani, The Minister Returned Without Shooting Angry

मंत्री नाराज, शूटिंग रद्द:कपिल शर्मा शोच्या पाहुण्या स्मृती इराणींना सुरक्षा रक्षकाने ओळखले नाही, संतापलेल्या मंत्री शूटिंग न करताच परतल्या

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्मृती त्यांचे पहिले पुस्तक लाल सलामच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये हजेरी लावणार होत्या. .
  • शूटिंग रद्द होताच सेटवर गोंधळ उडाला, सुरक्षा रक्षकदेखील पळून गेला.

'द कपिल शर्मा शो'मध्ये आपल्या 'लाल सलाम' या पुस्तकाचे प्रमोशन करण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना सेटच्या सुरक्षा रक्षकाने ओळखले नाही आणि त्यांना सेटवर जाण्यापासून रोखले. संतापलेले मंत्री शूटिंग न करताच परतल्या. या शोच्या माध्यमातून त्या त्यांच्या पुस्तकाचे प्रमोशन करणार होत्या.

जेव्हा कपिल आणि त्याच्या प्रोडक्शन टीमला याची माहिती मिळाली तेव्हा सेटवर एकच गोंधळ उडाला. यानंतर प्रोडक्शन टीमने स्मृती इराणी यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर शूटिंग रद्द करावे लागले. त्यानंतर मोठ्या संख्येने पोलिस दल आले आणि त्यांनी कपिलच्या प्रोडक्शन टीमशी बराच वेळ संवाद साधला. जेव्हा काहीच मार्ग निघाला नाही तेव्हा प्रोडक्शन टीमने सेटशी संबंधित लोकांना घरी जाण्यास सांगितले.

खूप समजावून सांगून देखील सुरक्षा रक्षकाने प्रवेश दिला नाही
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री त्यांचा ड्रायव्हर आणि दोन लोकांच्या टीमसह संध्याकाळी शोच्या शूटिंगसाठी कपिल शर्माच्या सेटवर पोहोचल्या होत्या. प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षक अण्णा त्यांना ओळखू शकला नाही आणि त्याने स्मृती यांना आत जाऊ दिले नाही. स्मृती सुरक्षा रक्षकाला सांगत होत्या की, त्यांना सेटवर एपिसोड शूट करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, त्या या शोच्या खास पाहुण्या आहेत. त्यावर सुरक्षा रक्षक म्हणाला, 'आम्हाला कोणताही आदेश मिळालेला नाही, माफ करा मॅडम, तुम्ही आत जाऊ शकत नाही.'

मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती यांनी कपिलच्या शोच्या प्रोडक्शन टीमशीही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती यांनी कपिलच्या शोच्या प्रोडक्शन टीमशीही बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय चौकशीविना आत गेला
स्मृती बराच वेळ सुरक्षा रक्षकाला समजावण्याचा प्रयत्न करत राहिल्या, पण तो त्यांना आत सोडायला तयार झाला नाही. तेवढ्यात झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय आला, तो कलाकारांसाठी फूड पॅकेटची डिलिव्हरी करण्यासाठी आला होता, गार्डने त्याला काहीही न विचारता सोडले. यावर केंद्रीय मंत्री चांगल्याच संतापल्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रोडक्शन टीम आणि कपिल शर्माला फोनही केला, पण त्यांचे बोलणे होऊ शकले नाही. अखेर नाराज होऊन स्मृती इराणी शूटिंग न करताच परतल्या.

मंत्र्यांना अडवल्याचे समजताच सुरक्षा रक्षकाने फोन बंद केला
ज्यांना आत जाण्यापासून रोखले त्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आहेत, हे जेव्हा सुरक्षा रक्षकाला समजले तेव्हा त्याने घाबरून सेटवरून पळ काढला. त्याने आपला फोनही बंद केला आहे. दुसरीकडे प्रोडक्शन टीमने सतत प्रयत्न करूनही स्मृती इराणी यांना शूटिंगवर परत बोलावण्यात त्यांना यश आले नाही.

मंगळवारी सनी देओलच्या मुलाच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले
स्मृती यांचा एपिसोड शूट होऊ शकला नसला तरी, मंगळवारी सनी देओल आपला मुलगा करण देओलच्या आगामी 'वेल्ले' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या सेटवर शूट करण्यासाठी पोहोचले. त्यांचा एपिसोड शूट झाला. आता स्मृती इराणी यांच्या पुस्तकाविषयी जाणून घेण्यासाठी वाचक आणि प्रेक्षकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.

'लाल सलाम' हे थ्रिलर पुस्तक लिहायला 10 वर्षे लागली
मिळालेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी यांनी 'लाल सलाम' हे थ्रिलर पुस्तक सत्य घटनेवर लिहिले असून हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्यांना सुमारे 10 वर्षे लागली आहेत. वेस्टलँड पब्लिशिंग कंपनीचे हे पुस्तक 29 नोव्हेंबरला बाजारात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...