आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या तरी कपिल शर्माचा शो परतणार नाही:निर्मात्यांनी जूनपर्यंत पुढे ढकलला 'द कपिल शर्मा शो', सध्या' इंडियन आयडल'च सुरु राहणार

किरण जैन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॉलिवूड कलाकारांच्या अनुपस्थितीने ऑफ एअर झाला होता शो

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ऑफ एअर झालेल्या द कपिल शर्मा शोचे या महिन्यात (मे मध्ये) छोट्या पडद्यावर कमबॅक होणार होते. पण आता ही योजना पुढे ढकलण्यात आली आहे. प्रॉडक्शन हाऊसच्या जवळच्या सुत्रांनी सांगितल्यानुसार, वाहिनीने हा शो जून महिन्यापर्यंत पुढे ढकलला आहे. परंतु याबाबतही अद्याप काहीच निश्चित झालेले नाही.

बॉलिवूड कलाकारांच्या अनुपस्थितीने ऑफ एअर झाला होता शो
सूत्रांनी सांगितले की, "जानेवारीत हा शो ऑफ एअर होण्यामागचे मुख्य कारण बॉलिवूड कलाकारांची अनुपस्थिती ही होती. कोरोनामुळे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत नाहीयेत. त्यामुळे कलाकार त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये येत नव्हते. काही आठवडे निर्मात्यांनी वेब सीरिज आणि टीव्ही कलाकारांसोबत हा शो सुरु ठेवला. परंतु यामुळे शोची टीआरपी अपेक्षेप्रमाणे राहू शकली नाही. त्यामुळे निर्मात्यांनी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. योजनेनुसार, द कपिल शर्मा शोची टीम मे महिन्यात छोट्या पडद्यावर परतणार होती. पण अद्यापही कोरोनाची परिस्थिती सुधारली नाही. त्यामुळे अनेक मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. अशा परिस्थितीत हा शोदेखील अजून काही दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही.'

कलाकार आणि क्रू मेंबर्सना माहिती दिली गेली
सूत्रांनी पुढे सांगितले की, "कोविडमुळे देशभरात परिस्थिती खूपच वाईट आहे. या परिस्थितीत कलाकारांना सेटवर येणे शक्य नाही, हे निर्मात्यांना ठाऊक आहे. मे महिन्यापर्यंत कोरोनाच्या परिस्थितीत सुधारणा होईल, असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही, म्हणूनच या महिन्यात निर्मात्यांनी शोच्या कमबॅकचा प्लान रद्द केला आहे. महाराष्ट्रात सध्या ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन आहे. त्यामुळे चित्रीकरणाला बंदी आहे. पुढील महिन्यात चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यास निर्माते शोच्या रिलाँचचा विचार करु शकतील. मात्र परिस्थिती तशीच राहिली तर पुढील महिन्यात रिलाँच शक्य होणार नाही. याविषयीची माहिती शोशी संबंधित सर्व कलाकारांना देण्यात आली आहे."

सहा महिन्यांपासून सुरु आहे 'इंडियन आयडॉल 12'
दरम्यान 'इंडियन आयडल 12' हा सांगितिक रिअॅलिटी शो सुरुच राहणार आहे. सूत्रांनी सांगितले की, 'इंडियन आयडॉल' हा शो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाला होता, तो एप्रिलमध्ये संपणार होता. पण चॅनेलने तसे केले नाही. 6 महिन्यांपासून सुरु असलेल्या या शोमध्ये मागील दोन महिन्यांपासून नऊ स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. कोणतेही एलिमिनेशन झाले नाही. त्यामुळे 'द कपिल शर्मा शो' जोपर्यंत परतत नाही, तोपर्यंत हा शो सुरू राहिल."

कृष्णा अभिषेकने शो मे महिन्यात परतणार असल्याचे म्हटले होते
द कपिल शर्मा शो मध्ये सपनाची भूमिका साकारणार्‍या कृष्णा अभिषेकने त्यांचा शो मे महिन्यात परतणार असल्याचे सांगितले होते. मागील महिन्यात झालेल्या संभाषणात तो म्हणाला होता, "हा कार्यक्रम मे महिन्यात टीव्हीवर परत येईल. आम्ही अद्याप तारीख निश्चित केलेली नाही. यावेळी शोमध्ये बर्‍याच वेगळ्या गोष्टी दिसतील. सेट पुन्हा तयार केला जाईल. आमच्याकडे नवीन सेट असेल यामध्ये आणखी काही गोष्टी नवीन दिसतील. आम्ही लवकरच तुम्हाला एक चांगली बातमी देऊ," असे कृष्णाने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...