आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'द कपिल शर्मा शो'च्या रविवारच्या भागात अभिनेते गोविंदा यांनी हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्मा, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि चंदन प्रभाकर यांनी त्यांच्यासोबत भरपूर धमाल मस्ती केली. मात्र या भागात गोविंदाचा भाचा आणि विनोदवीर कृष्णा अभिषेक गैरहजर होता. एका मुलाखतीत कृष्णाने मामा गोविंदासोबत स्टेज शेअर न करण्यामागचे कारण सांगितले आहे. त्याने सांगितल्यानुसार, एकेकाळी त्याची आपल्या मामासोबत स्ट्राँग बाँडिंग होती. मात्र आता पुर्वीसारखे नाते राहिलेले नाही.
'आता या नात्यात फूट पडली आहे'
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कृष्णा म्हणाला, ‘चीची मामा सेटवर येणार, ही गोष्ट मला 10 दिवसांपूर्वी कळली. त्यांच्यासोबत सुनिता मामी येणार नव्हती. शोच्या टीमला ही गोष्ट समजल्यावर, मला याने काहीच फरक पडणार नाही, असे त्यांना वाटले. मात्र, काही वर्षांपूर्वी जेव्हा त्या या मंचावर आल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्यासमोर कोणतेच स्कीट करू नये, अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच मी यावेळीही त्यांच्यासमोर आलो नाही.’
कृष्णा पुढे म्हणाला, ‘माझे आणि मामाचे फार छान नाते होते. मात्र, जेव्हा दोन लोकांच्या नात्यात फूट पडते तेव्हा त्यांच्यासमोर विनोद करणे कठीण असते. कारण विनोद निर्मितीसाठी सेटवर हलके फुलके वातावरण असणे गरजेचे असते. मी त्याला एक छानशी मानवंदना दिली असती. आणि आणखी बरीच कमाल दाखवू शकलो असतो. मात्र, यावेळी मी ते टाळले.’
'मामा माझ्या मुलांना बघायला हॉस्पिटलमध्ये आले नव्हते'
या मुलाखतीत कृष्णाने सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात त्याने ब-याचदा गोविंदाशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कृष्णाने सांगितल्यानुसार, 'मामा माझ्या मुलांना बघायला हॉस्पिटमध्येही आले नव्हते. त्यावेळी माझ्या दोन मुलांपैकी एक जण जीवन-मृत्यूशी झुंज देता होता. त्यांनी माझ्या फोन कॉललादेखील उत्तर दिले नव्हते.'
'साहजिकच मला वाईट वाटले होते'
कृष्णा पुढे म्हणाला, "गैरसमजातून जन्माला आलेल्या गोष्टी मी किती काळ सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. अर्थात मलाही वाईट वाटते. त्यांना मला भेटायचे नाही, मीदेखील त्यांना भेटू इच्छित नाही. आमच्या दोघांमध्ये फक्त कपिलच पॅच अप घडवून आणू शकतो."
काय आहे वादाचे कारण?
गेल्या काही वर्षांपासून गोविंदा आणि कृष्णाच्या कुटुंबात मतभेद सुरू होते. वृत्तानुसार, काश्मिरी शाह (कृष्णा अभिषेकची पत्नी) ने एका ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘काही लोक पैशासाठी नाचतात’. हे वाचून गोविंदाच्या पत्नी सुनीता यांना वाटले होते की, ती गोविंदाला उद्देशून असे म्हणत आहे. यामुळे दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि तेव्हापासून या दोन्ही कुटुंबाचा एकमेकांमधील संवाद बंद आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.