आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Tv
  • The Kapil Sharma Show: Ranjeet Who Recently Reached Comedy Show Claims That, Amitabh Bachchan Has Insomnia, He Can't Sleep At Home So He Sleep In Studio

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

द कपिल शर्मा शो:शोमध्ये रंजीत यांचा दावा, म्हणाले - अमिताभ बच्चन यांना निद्रानाश आहे, घरी झोपू शकत नाही म्हणून स्टुडिओमध्ये झोप घेतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शोमध्ये गुलशन आणि रंजीत स्वत:शी संबंधित रंजक गोष्टी शेअर करताना दिसणार आहेत.

गुलशन ग्रोव्हर, रंजीत आणि बिंदू हे बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार या आठवड्यात 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार आहेत. वाहिनीने या स्पेशल एपिसोडचा प्रोमो त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नुकताच प्रसिद्ध केला आहे. प्रोमोमध्ये कपिल तिन्ही कलाकारांसोबत मस्ती करताना दिसत आहे. कपिलशी झालेल्या संभाषणादरम्यान रंजीत यांनी दावा केला की, अमिताभ बच्चन यांना निद्रानाश आहे आणि म्हणून ते स्टुडिओत झोप पूर्ण करतात.

कपिलच्या गुलशन आणि रंजीत यांच्याशी रंगल्या गप्पा
शोमध्ये गुलशन आणि रंजीत स्वत:शी संबंधित रंजक गोष्टी शेअर करताना दिसणार आहेत. कपिल त्यांना 'सेटवर यायला कोण उशीर करतो?' असा प्रश्न विचारतो. त्यावर उत्तर देताना गुलशन ग्रोव्हर म्हणतात, "अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी वेळेत सेटवर पोहोचतात." तर बिंदू यांनी सांगितले की, 'अमिताभ बच्चनसुद्धा वेळेवर येतात', त्यांना मध्ये थांबवत रंजीत सांगतात की, "अमिताभ बच्चन यांना निद्रानाश आहे, ते घरी झोपू शकत नाही, म्हणून स्टुडिओमध्ये झोप पूर्ण करतात," असा खुलासा त्यांनी यावेळी केला.